थंडीत कांदा पिकावर रोगाचा प्रादुर्भाव

तपकिरी करपा रोगाने प्रादुर्भावग्रस्त कांदा शेत.
तपकिरी करपा रोगाने प्रादुर्भावग्रस्त कांदा शेत.

सध्या थंडीचा कडाका चांगलाच वाढलेला असून, धुकेही पडत आहे. परिणामी या काळात कांदा व लसूण पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यांच्या नियंत्रणासाठी खालील उपाययोजना कराव्यात.

आयरिश येलो स्पॉट 
हा विषाणूजन्य रोग असून, बीजोत्पादनाच्या कांदा पिकावर या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो. या रोगामुळे पानावर आणि फुलांच्या दांड्यावर पिवळसर चौकोनी आकाराचे चट्टे पडतात. तेथील पेशी मरून पाने किंवा फुलांचे दांडे कोलमडून पडतात. फुलांच्या दांड्यावर बी लागत नाही. या रोगाचे विषाणू फुलकिड्यांमार्फत पसरतात. 

व्यवस्थापन  
फुलकिड्यांचा बंदोबस्त केल्यास या रोगाचे प्रमाण कमी करता येते.

पिवळा बुटका रोग -
हा विषाणूजन्य रोग आल्यास कांद्याची व लसणाची रोपे बुटकी राहतात. पाने वाकडी होऊन पिवळी पडतात. फुलांचे दांडे बारीक राहतात आणि त्यावरही पिवळेपणा येतो. 

नियंत्रण व्यवस्थापन 
विषाणू पसरविणाऱ्या किडींच्या बंदोबस्ताकरिता, 
रोगग्रस्त रोपे उपटून टाकावीत. 
फवारणी प्रतिलिटर पाणी
प्रोफेनोफॉस १ मिलि, कार्बोसल्फान १ मिली किंवा फिफ्रोनील १ मिली  
- डॉ. शैलेंद्र गाडगे, ०२१३५-२२२०२६ (राष्ट्रीय कांदा व लसूण संशोधन संचालनालय, राजगुुुरुनगर, जि. पुणे.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com