राज्यात उष्ण, दमट हवामानाचा अंदाज 

प्रतिनिधी
सोमवार, 6 एप्रिल 2020

मराठवाड्यात पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामान असल्याने तुरळक ठिकाणी हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे. राज्यात बहुतांशी ठिकाणी हवामान मुख्यत: उष्ण व दमट राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. 

पुणे - तापमानाचा पारा चाळीशी पार गेल्याने उन्हाचा चटका असह्य होत आहे. रविवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये मालेगाव, जळगाव, सोलापूर, परभणी येथे ४० अंशापेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली. मराठवाड्यात पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामान असल्याने तुरळक ठिकाणी हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे. तर राज्यात बहुतांशी ठिकाणी हवामान मुख्यत: उष्ण व दमट राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

रविवारी (ता.५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये मालेगाव येथे उच्चांकी ४०.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. राज्यात अनेक ठिकाणी तापमान ३७ ते ४१ अंशांच्या दरम्यान आहे. सकाळपासून उन्हाचा चटका वाढण्याबरोबर दुपारी झळा वाढून उकाड्यामुळे घामाच्या धारा वाहू लागल्या आहेत. 

पुणेकरांनो चिंता करू नका; शहराला पुरेल इतका भाजीपाला उपलब्ध

मध्यप्रदेश व विदर्भ आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून २.१ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. तर उत्तर महाराष्ट्रापासून केरळपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा कायम आहे. आज (ता.६) मराठवाड्यातील हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यात हलक्या पावसाचा अंदाज आहे. तर भंडारा, गोंदिया जिल्ह्यातही हलक्या सरी पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. 

रविवारी (ता. ५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे किमान व किमान (कंसात) तापमान, (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३९.१, जळगाव ४०.०, धुळे ३९.६, कोल्हापूर ३७.५, महाबळेश्‍वर ३२.५, मालेगाव ४०.८, नाशिक ३७.८, निफाड ३५.२, सांगली ३८, सातारा ३९.०, सोलापूर ४०.४, डहाणू ३३.०, सांताक्रूझ ३४.८, रत्नागिरी ३२.४, औरंगाबाद ३७.६, परभणी ४०.०, नांदेड ३९.१, अकोला ३९.७, अमरावती ३८.४, बुलडाणा ३६.८, ब्रह्मपूरी ३८.६, गोंदिया ३५.०, नागपूर ३७.९, वर्धा ३९.५. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Forecast of hot climate in the state