esakal | शहीद जवान अमर रहे...; हुंदक्यांनी दिला अखेरचा निरोप
sakal

बोलून बातमी शोधा

शहीद जवान अमर रहे...; हुंदक्यांनी दिला अखेरचा निरोप

शहीद जवान अमर रहे...; हुंदक्यांनी दिला अखेरचा निरोप

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सुलतानपूर-बिबी (जि. बुलडाणा) : बुलडाणा जिल्ह्यातील जवान किशोर काळुसे शहीद झाल्यामुळे सर्वत्र शोककळा पसरली आहे. चिखली येथील शहीद जवान कैलास पवार, शेगाव संस्थानचे व्यवस्थापकीय विश्‍वस्त शिवशंकरभाऊ पाटील आणि आता लोणार तालुक्यातील बिबी येथील जवानाचा कर्तव्यावर असताना ४ ऑगस्टला दुपारी दोन वाजताच्या सुमारास हृदयविकाराच्या झटक्याने अहमदनगर येथे मृत्यू झाला. यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

लोणार तालुक्यातील बिबी येथील जवान किशोर काळुसे याच्यावर गुरुवारी (ता. ५) बिबी येथील स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. तीन वर्षीय मुलगी शेजल व भाऊ नूतन काळुसे यांनी जवान किशोर काळुसेच्या पार्थिवाला मुखाग्नी दिली. ४ ऑगस्टला दुपारी दोन वाजताच्या सुमारास किशोर काळुसेला हृदयविकाराचा झटका आल्याने प्राणज्योत मालवली होती.

हेही वाचा: वन्यप्राण्यांपासून शेतीच्या संरक्षणासाठी ‘सजीव कुंपण’

अहमदनगर येथील इंडियन आर्मीच्या वाहनाने त्याचे पार्थिव ५ ऑगस्टला दुपारी तीन वाजताच्या सुमारास बिबी येते आणण्यात आले. यावेळी ग्रामस्थांनी व ग्रामपंचायतीच्या वतीने गाव स्वच्छ करून, महिलांनी पार्थिव जाण्याच्या मार्गावर व स्मशानभूमीत रांगोळी काढली होती. राहत्या घरून अंतयात्रा गावातील मुख्य रस्त्याने निघून बस स्टँड परिसरातून स्मशानभूमीत पोहोचली. दरम्यान, रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांनी एकच गर्दी केली होती.

किशोरच्या पार्थिव ठेवलेल्या रथावर चहूबाजूने पुष्पवर्षाव होत होता. पार्थिव स्मशानभूमीत आल्यानंतर अहमदनगर येथील आर्मीच्या अधिकाऱ्यांनी जवान किशोर काळुसे यांना सलामी दिली. यावेळी परिसरातील सर्वच पक्षाचे नेते मंडळी तसेच प्रतिष्ठित नागरिक व बिबी येथील तसेच परिसरातील नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होती.

हेही वाचा: बुलडाणा जिल्ह्यावर पुन्हा शोककळा; २४ तासांत दुसरा सैनिक शहीद

शहीद जवान अमर रहेची घोषणा

किशोरच्या पार्थिवास अग्नी दिल्यानंतर स्मशानभूमी परिसर ‘शहीद जवान अमर रहे’च्या घोषणांनी दणाणून गेला होता. आलेल्या मान्यवरांनी किशोरच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून दर्शन घेतले. अंत्यविधी परिसर ग्रामपंचायत बिबी व गावातील तरुण मंडळींनी तसेच मॉ अ‍कॅडमी मांडवा येथील मुलांनी स्वच्छ करून ठेवला होता. बिबी पोलिस स्टेशनच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. ग्रामपंचायतीच्या वतीने मान्यवरांना बसण्याची व्यवस्था केलेली होती. येथील व्यापाऱ्यांनी कडकडीत बंद पाळून जवान किशोर काळुसे यांना श्रद्धांजली अर्पण केली व सर्व व्यापारी वर्ग अंत्यसंस्कार प्रसंगी उपस्थित होते.

loading image
go to top