
मुंबई : मुंबईत सुरु असलेल्या रिमझिम पावसामुळे पश्चिम द्रुतगती महामार्गावर वांद्रेहून बोरिवलीकडे जाणाऱ्या मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. विशेषतः खेरवाडी, सांताक्रुज, विलेपार्ले, अंधेरी, जोगेश्वरी आणि गोरेगाव या प्रमुख ठिकाणी वाहनांच्या रांगा लांबचलांब दिसून येत आहेत. यामुळे घरी परतणाऱ्या प्रवाशांचा चांगलाच खोळंबा झाला आहे.