इंदापूर तालुक्यात गहू पीक जोमात 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 मार्च 2017

नीरा नरसिंहपूर : मागील वर्षी दुष्काळी परिस्थितीमुळे धान्य उत्पादनावर मोठा परिणाम झाला होता. परंतु माेसमी पावसाने चांगली हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी नगदी व धान्याचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले आहे. चालू वर्षी थंडी व पोषक हवामानामुळे येथील गव्हाचे पीक जोमात आले आहे, असे शेतकऱ्यांनी सांगितले. 

इंदापूर तालुका उसाचे आगार म्हणून प्रसिद्ध असला तरी ज्वारी, गहू, हरभरा, केळी, डाळिंब आदी पिकांमुळे या तालुक्याची वेगळी ओळख निर्माण झाली आहे. 

नीरा व भीमा नद्यांच्या परिसरात पाण्यामुळे बऱ्यापैकी उसाचे पीक घेतले जाते. परंतु मागील दोन वर्षात पावसाने ओढ दिल्याने सर्वच पिकांना फटका बसला होता. तर उसाच्या उपलब्धतेअभावी कारखाने लवकरच बंद करावे लागले.

मेसमी पावसाने यावर्षी चांगली हजेरी लावल्याने विहिरी, बोअरला पाणी वाढले. त्याचा फायदा विविध पिकांना झाला आहे. उसाचे क्षेत्र रिकामे झाल्यामुळे शेतकऱ्यांनी गहू पिकाला पसंती दिली. त्यामध्ये लोकवन, २१८९ आदी जातीच्या बियाणांची पेरणी करण्यात आली.

यंदा गव्हाला पोषक हवामान मिळाले, त्यामुळे त्याची वाढ चांगल्या प्रमाणात झाली आहे. सध्याला शेतात गहू उभा असल्याने काढणीस सुरवात करण्यात येणार आहे.

Web Title: Indapur Wheat farming agrowon