उत्पादकांसाठी केळी गोड

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 14 जानेवारी 2018

जळगाव - केळीच्या दरात मागील सात आठ दिवसांमध्ये एक क्विंटलमागे १०२५ रुपयांनी वाढ झाली आहे. दर्जेदार केळीचा तुटवडा, कमी तापमानामुळे केळी पक्व होण्यास अधिकचा वेळ लागत असल्याने पुरवठा कमी झाला आहे. परिणामी, केळीचे दर वाढले असून, ते टिकून राहण्याचे संकेत बाजारातील सूत्रांनी दिले आहेत.

 केळीच्या दरात वाढ होण्यास मागील शनिवारपासून (ता. ६) सुरवात झाली. शनिवारपर्यंत कांदेबाग केळीला ९०० रुपये प्रतिक्विंटलचा दर होता. त्यात किरकोळ वाढ झाली. सोमवारी (ता. ८) दर ९७५ रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोचले. ही दरवाढ मध्यंतरीदेखील सुरूच राहिली. आजघडीला १०२५ रुपये प्रतिक्विंटल दर आहे. 

सध्या सावदा (ता. रावेर) येथून जम्मू- काश्‍मीरसह पंजाब, दिल्ली, हरियाना, उत्तर प्रदेशात केळी पाठविली जात आहे. जळगाव, भडगाव भागातून मुंबई, नाशिकच्या बाजारात केळी पाठविली जात आहे. मुंबई येथील बाजारातूनही केळीची मागणी आहे. जळगावमधून रोज सुमारे अडीच हजार क्विंटल केळी मुंबई, ठाणे, कल्याण व नाशकात जात आहे. तर सावदा येथून उत्तरेकडील राज्यांमध्ये रोज सुमारे पाच हजार क्विंटल केळी बॉक्‍समध्ये पाठविली जात असल्याचे सांगण्यात आले. 

रावेर, यावल, मुक्ताईनगर भागात पिलबाग व आगाप लागवडीच्या नवतीमधील केळीची कापणी सुरू आहे. तर चोपडा, जळगाव, भडगाव भागांत कांदेबाग केळीची कापणी अंतिम टप्प्यात आहे. जुनारीमधील केळीला फारशी मागणी नसल्याने तिची स्थानिक बाजारातच वेफर्स व इतर कारणांसाठी विक्री सुरू आहे. यातच किमान तापमान केळी पिकाला मानवणारे नसल्याने कापणीच्या अवस्थेतील किंवा घड निसवलेल्या आगाप नवती बागांमधील घड पक्व होण्यास काहीसा वेळ लागत आहे. परिणामी, दर्जेदार केळी मिळत नसल्याची माहिती मिळाली. बऱ्हाणपूर येथील बाजारात केळीचे कमाल दर १५०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत आहेत. बऱ्हाणपूरचे काही व्यापारी मुक्ताईनगर, रावेरातून केळीची आगाऊ नोंदणी करून पुरवठा करून घेत असल्याचे चित्र आहे. 

केळीला स्थानिक बाजारासह मुंबई, ठाणे व नाशिक येथून मागणी आहे. तसेच उत्तरेकडेही रोज निर्यात सुरू आहे. चांगली केळी फारशी मिळत नसल्याचे चित्र असून, पुढे काही दिवस केळी बाजारात तेजी असेल, असे वाटते. 
- सुधाकर चव्हाण, केळी बाजार अभ्यासक

Web Title: jalgaon news Banana agrowon