जालन्यात टोमॅटो प्रतिक्विंटल ८०० ते १२०० रुपये

प्रतिनिधी
रविवार, 6 ऑगस्ट 2017

जालना - येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता. ५) टोमॅटोच्या ४०० कॅरेटची आवक झाली होती. या टोमॅटोला ८०० ते १२०० रुपये प्रतिकॅरेटचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

जालना - येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता. ५) टोमॅटोच्या ४०० कॅरेटची आवक झाली होती. या टोमॅटोला ८०० ते १२०० रुपये प्रतिकॅरेटचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

हिरव्या मिरचीची १५ क्‍विंटल आवक झाली. या मिरचीला २००० ते ३००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. २५ कॅरेट आवक झालेल्या वांग्याचे दर २०० ते ३५० रुपये प्रतिकॅरेट राहिले. भेंडीची आवक ३ क्‍विंटल झाली. या भेंडीला  २००० ते २५०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. २५ कॅरेट आवक झालेल्या दोडक्‍याचे दर १५० ते २०० रुपये प्रतिकॅरेट राहिले. मेथीच्या ३००० जुड्यांची आवक झाली. या मेथीच्या जुड्याला ८० ते १०० रुपये प्रतिशेकड्याचा दर मिळाला. कोथिंबिरीच्या २००० जुड्यांची आवक झाली. कोथिंबिरीचे दरही ८० ते १०० रुपये प्रतिशेकडाच राहिले. २००० जुड्यांची आवक झालेल्या पालकला प्रतिशेकडा ५० ते १०० रुपयांचा दर मिळाला. काकडीची आवक ८ क्‍विंटल झाली. या काकडीला १२०० ते १५०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. ८ क्‍विंटल आवक झालेल्या फ्लाॅवरचे दर १५०० ते २००० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला. कोबीची आवक १० क्‍विंटल तर दर १५०० ते ३००० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला. शनिवारी दुपारी १ वाजेपर्यंत मोसंबीची मोठी बाजारपेठ असलेल्या जालना बाजार समितीमध्ये मोसंबीची जवळपास ६ क्‍विंटल आवक झाली होती. या मोसंबीला १००० ते १३०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

Web Title: jalna news tomato