कोल्हापुरात कांद्यास दहा किलोस ४० ते १६० रुपयांचा दर

राजकुमार चौगुले
मंगळवार, 25 जून 2019

 बाजार समितीत कांद्यास दहा किलोस ४० ते १६० रुपये दर मिळाला. कांद्याची दररोज दहा ते अकरा हजार पोती आवक झाली. बटाट्याची आवक चार हजार पोत्यांची होती. बटाट्यास दहा किलोस ८० ते १६० रुपये इतका दर मिळाल्याची माहिती मिळाली.

कोल्हापूर - बाजार समितीत कांद्यास दहा किलोस ४० ते १६० रुपये दर मिळाला. कांद्याची दररोज दहा ते अकरा हजार पोती आवक झाली. बटाट्याची आवक चार हजार पोत्यांची होती. बटाट्यास दहा किलोस ८० ते १६० रुपये इतका दर मिळाल्याची माहिती मिळाली.

लसणाची शंभर ते दीडशे पोती आवक होती. लसणास दहा किलोस ३०० ते ९०० रुपये इतका दर होता. गेल्या सप्ताहाच्या तुलनेत या सप्ताहात टोमॅटोच्या आवकेत वाढ झाली. अडीच ते तीन हजार क्रेट टोमॅटो बाजार समिती दाखल झाले. त्यास दहा किलोस ५० ते २०० रुपये दर मिळाला. 

ओल्या मिरचीची पाचशे ते सहाशे पोती आवक होती. मिरचीस दहा किलोस १०० ते ४०० रुपये दर होता. कारल्याची दोनशे ते तीनशे पाट्या आवक होती. कारल्यास दहा किलोस २०० ते ४५० रुपये इतका दर मिळाला. भेंडीची साडेतीनशे ते चारशे करंड्या आवक होती. भेंडीस दहा किलोस ८० ते ४०० रुपये इतका दर होता. 

कोथिंबिरीची १३ ते १४ हजार पेंढ्या आवक झाली. कोथिंबिरीस शेकडा एक हजार ते चार हजार रुपये इतका दर होता. या सप्ताहाच्या तुलनेत कोथिंबिरीच्या आवकेत फारशी वाढ नसल्याचे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले. मेथी, पालक शेपूस शेकडा ५०० ते ८०० रुपये दर मिळाला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Kolhapur, onions cost ten to 40 to 160 rupees