राज्यात हलक्या पावसाचा अंदाज

rain in state
rain in state

पुणे - राज्यात गेल्या दोन-तीन दिवसांपासून पावसाने काहीशी उघडीप आहे. मध्य महाराष्ट्र, कोकण, घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला. उर्वरित राज्यात हलक्या पावसासह श्रावण सरींचा अनुभव येत आहे.

आज (ता. १२) राज्यात मुख्यत: पावसाची उघडीप राहण्याची शक्यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार, तर उर्वरित राज्यात हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.  गुजरातमधील सौराष्ट्र आणि कच्छ परिसरावर हवेचे कमी दाबाचे क्षेत्र सक्रीय आहे. अरबी समुद्रावरील बाष्प या कमी दाब क्षेत्राकडे गेल्याने राज्यात पावसाने काहीशी विश्रांती घेतली आहे. तर कोकण, घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार सरी येत आहेत. उर्वरित राज्यात उन्ह सावल्यांच्या खेळात हलक्या सरी येत आहेत. पूर्व मध्य बंगालच्या उपसागरात समुद्र सपाटीपासून ३.१ ते ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. मंगळवारपर्यंत (ता. १३) या भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहेत. मंगळवारी आणि बुधवारी ओडीशा, झारखंड, मध्य प्रदेश, छत्तीसगडसह पूर्व भारतात मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे.

रविवारी (ता. ११) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये (स्रोत - हवामान विभाग) :

कोकण : दोडामार्ग ६०, खालापूर, कुडाळ, मंडणगड, माथेरान, पोलादपूर प्रत्येकी ५०, पोलादपूर, लांजा, संगमेश्वर ४०, म्हसळा, मोखेडा, शहापूर, कणकवली, महाड, वैभववाडी, भिारा, तळा प्रत्येकी ३०.

मध्य महाराष्ट्र : पौड १३०, चंदगड १२०, महाबळेश्वर, राधानगरी प्रत्येकी १००, त्र्यंबकेश्वर ८०, गगणबावडा, लोणावळा, आजरा प्रत्येकी ७०, पन्हाळा, भोर, वेल्हा, जावळी मेढा प्रत्येकी ६०, गारगोटी, पाटण, इगतपूरी प्रत्येकी ५०, खेड, शाहूवाडी, वडगाव मावळ, पेठ प्रत्येकी ४०, सुरगाणा, अक्कलकुवा, अकोला प्रत्यकी ३०.

घाटमाथा : शिरगाव १७०, आंबोणे, दावडी ११०, ताम्हिणी ९०, वाणगाव ८०, लोणावळा, खंद, शिरोटा प्रत्येकी ७०, डुंगरवाडी, ठाकूरवाडी प्रत्येकी ६०.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com