राज्यातील द्राक्ष हंगाम 70 टक्के पूर्णत्वास 

ज्ञानेश उगले 
मंगळवार, 18 एप्रिल 2017

नाशिक : जानेवारी महिन्यात दीर्घकाळ रेंगाळलेल्या थंडीचा परिणाम होऊन यंदा द्राक्ष हंगाम 15 दिवसांपेक्षा अधिक लांबला आहे. या स्थितीत गत सप्ताहापर्यंत राज्यातील द्राक्ष हंगाम 70 टक्के आटोपला आहे. या स्थितीत बाजारात थॉमसन व सोनाका हे दोनच वाण मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. या वेळी द्राक्षांना देशांतर्गत बाजारपेठेत किलोला सरासरी 20 ते 30 रुपये व सरासरी 25 रुपये दर मिळाला. तर निर्यातक्षम द्राक्षांना 30 ते 50 व सरासरी 40 रुपये दर मिळाला. 

सांगली आणि पुणे विभागातील द्राक्ष हंगाम 80 टक्के आटोपला असून, नाशिक व सोलापूर विभागांतील द्राक्ष बागा 60 ते 75 टक्के शिल्लक आहेत. गतवर्षीच्या तुलनेत यंदा 10 ते 20 टक्के अधिक प्रमाणात द्राक्षे शिल्लक आहेत. जानेवारी, फेब्रुवारी महिन्यांत दीर्घकाळ तापमान 5 ते 6 अंश सेल्सिअसपर्यंत उतरले होते. परिणामी, या द्राक्षांना पक्वता येण्यास पंधरा दिवसांपेक्षा अधिक काळ लागला. त्यामुळे बहुतांशी द्राक्षांचे उत्पादन एकाच वेळी बाजारात आल्याने अधिक आवकेची स्थिती निर्माण झाली. गत सप्ताहाच्या अखेरपर्यंत युरोपीय बाजारपेठेत 1 लाख टनापर्यंत द्राक्षांची निर्यात झाली आहे. ही निर्यात गतवर्षीपेक्षा किमान 10 हजार टनांनी अधिक झाली आहे. मात्र यंदा कमी शूगरची द्राक्षे, द्राक्ष वाहतूक बोटीचे वाढलेले भाडे, युरो पौंड, पेसाच्या दरात झालेले बदल याचाही मोठा फटका निर्यातदारांना बसला. या स्थितीत मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत हंगाम चालेल असे या क्षेत्रातील जाणकारांनी सांगितले. 

गतवर्षीच्या तुलनेत यंदा कमी दर मिळाल्याने द्राक्ष उत्पादक अडचणीत सापडले आहेत. सध्याचे दर अजून सप्ताहभर तरी टिकून राहतील असा अंदाज आहे. 
- कैलास भोसले, अध्यक्ष- मध्यवर्ती विज्ञान समिती- राज्य द्राक्ष बागायतदार संघ, पुणे. 

द्राक्ष वाण किमान कमाल सरासरी 
थॉमसन 20 30 25
सोनाका 25 35 30 
देशांतर्गत बाजारपेठेतील दर प्रति किलोचे

निर्यातक्षम द्राक्षांचे दर (प्रति किलोचे) 
द्राक्ष वाण---किमान---कमाल---सरासरी 
थॉमसन---35---45---40 
सोनाका---35---45---40 

Web Title: maharashtra state greps 70% complete