तणावर मात करण्यासाठी रोटरकडे कल

तणावर मात करण्यासाठी रोटरकडे कल

जळकोट - तालुक्‍यातील शेतकरी खरिपातील तूर पीक सांभाळत आंतरमशागत करून तणांचा नाश करण्यासाठी रोटरचा वापर करत असल्याचे चित्र आहे.

तालुक्‍यात खरिपात सध्या मूग, उडीद, सोयाबीन काढल्यानंतर काही प्रमाणात संकरित ज्वारी वगळता तूर पीक उभे आहे. खरिपात सोयाबीनचे उत्पादन अत्यल्प आल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे; कारण मोठा खर्च करून या पिकाचे संगोपन करून हाती मात्र काहीच लागले नाही. त्यामुळे आता सर्व भिस्त तुरीवरच आहे. शेतीत असलेल्या पट्टा पद्धतीने पेरलेले तूर पिकातील तण काढण्यासाठी रोटरचा वापर वाढला आहे; कारण तुरीच्या दोन पट्ट्यात ट्रॅक्‍टर जाईल असे अंतर असते. त्यात सोयाबीन, मूग, उडीद काढल्यानंतर मोठ्या प्रमाणात तणाचे थैमान माजले आहे. यात कुरडू, केना, काटेरी गवत, मीरा, मुसळमोडी, शेवरी, गवत, भोंडमनी, गाजर गवत आदी तणांचा समावेश आहे. त्यामुळे ही तणे पाच फुटांपर्यंत वाढली असल्याने व कापून काढण्यासाठी मजुरी जास्त जात असल्याने अनेक  शेतकरी रोटरचा पर्याय निवडत आहेत.

ट्रॅक्‍टरचा रोटर केल्यामुळे दुहेरी फायदा होतो असे शेतकरी सांगत आहेत. यामुळे तण नष्ट होते. तर तणाचे छोटे छोटे तुकडे करून ते जमिनीत मिसळले जातात त्यामुळे त्याचे चांगले खत तयार होते. तसेच पुढील वर्षी तण कमी प्रमाणावर येते; कारण तणाचे बियाणे नष्ट होते. म्हणून थोडा खर्च अधिक झाला तरी लाभ होतो. एका एकरला रोटर करण्यासाठी एक हजार ते बाराशे रुपये इतका खर्च येतो असे शेतकरी सांगत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com