दुष्काळात फुलवली झेंडूची शेती

भास्कर सोळंके
रविवार, 20 जानेवारी 2019

जातेगाव - काठोडा (ता. गेवराई) येथील बंडू तात्यासाहेब घाटूळ यांनी दुष्काळी परिस्थितीवर मात करत मध्यम आणि हलक्‍या जमिनीत जिद्दीने शेती यशस्वी करून चार एकरांत झेंडूच्या फुलशेतीतून लाखो रुपये मिळविले आहेत. ही फुले थेट मुंबई व हैदराबाद बाजारपेठेत विक्रीसाठी नेत तीन महिन्यांत दर अपेक्षित मिळाल्यास पाच लाख रुपये उत्पन्न मिळेल, असा विश्वास बंडू घाटूळ यांनी व्यक्त केला. 

गोदावरी नदीकाठी असलेल्या काठोडा (ता. गेवराई) येथील बंडू तात्यासाहेब घाटूळ यांना आठ एकर शेतजमीन असून, जोडव्यवसाय म्हणून २००९ पासून रोपवाटिका सुरू केली आहे. रोपवाटिकेत विविध रोपे उपलब्ध करून त्यांनी स्वतःच्या शेतात फुलशेती करण्याचा निर्णय घेतला. दिवाळीपूर्वी मध्यम व हलक्‍या शेतजमिनीत सहा बाय दीड फूट दुहेरी पद्धतीने झेंडूच्या एकरी दहा हजार रोपांची लागवड केली. एकूण चार एकरांत चाळीस हजार रोपांची लागवड केली. ठिबक आणि मल्चिंग वापर केला. एकरी १०-२६-२६ दोन पोते, लिंबोळी एक पोते, बॉयझाम २५ किलो खताची मात्रा दिली. त्यानंतर लिक्विड खते दिली. लागवड झाल्यानंतर चाळीस दिवसांनंतर फुलांची तोडणी सुरू झाली. आतापर्यंत तीन वेळा तोडणी करून चार एकरांतील झेंडूची ७० ते ८० रुपये प्रतिकिलो दराने विक्री केले. पंधरा टन झेंडूची मुंबई व हैदराबाद येथील बाजारपेठेत विक्री करून साधारण अडीच लाख रुपये मिळाले. आणखी अडीच लाख उत्पन्न अपेक्षित आहे.

एकीकडे निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडत चालला आहे. यंदा तर कहर झाला. कापूस आणि उसाचे पीक पावसाअभावी वाया गेले; मात्र काठोडा येथील शेतकरी बंडू घाटूळ यांनी योग्य नियोजन करून फुलशेतीतून लाखो रुपये मिळविले आहेत. 

‘ॲग्रोवन’मधील फुलशेतीची यशोगाथा वाचून फुलशेती करण्याची प्रेरणा मिळाली असून इतर पिकांपेक्षा यंदा झेंडूची शेती योग्य नियोजन केल्याने यशस्वी झाली.
-बंडू घाटूळ, शेतकरी

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marigold farming in drought