मंगरूळपीरच्या ॲग्रोवन कट्ट्याचा  आज दहावा वर्धापन दिन

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 3 ऑगस्ट 2017

नागपूर  - कृषी विस्तारात महत्त्वाची भूमिका बजावलेल्या मंगरुळपीर (जि. वाशीम) येथील रशीद शॉदा यांचा ॲग्रोवन कट्टा दहाव्या वर्षात पदार्पण करीत आहे. यानिमित्ताने गुरुवारी (ता. 3) दुपारी तीन वाजता येथील तालुका कृषी कार्यालयाच्या सभागृहात एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 

मंगरुळपीर येथील अकोला चौकात रशीद शॉदा यांचे सायकल दुरुस्तीचे दुकान होते. या ठिकाणी त्यांनी सुरवातीला ॲग्रोवनचा एक अंक ठेवला. त्यांच्या दुकानात येत ॲग्रोवन वाचणाऱ्या शेतकऱ्यांची येथे गर्दी होऊ लागली. त्यामुळे त्यांनी ॲग्रोवनचे दहा अंक ठेवण्यास सुरवात केली. शेतकरी या ठिकाणी एकत्र येत असल्याने कृषी अधिकारी, कर्मचारीदेखील याच ठिकाणी येऊन शेतकऱ्यांना तांत्रिक मुद्यावर मार्गदर्शन करू लागले. त्यामुळे ही जागा पुढे ॲग्रोवन कट्टा म्हणून नावारुपास आली. 

गेल्या नऊ वर्षांपासून रशीद शॉदा यांनी या उपक्रमात सातत्य ठेवले आहे. ॲग्रोवन कट्टा दहाव्या वर्षात पदार्पण करीत असून वर्धापन दिनाच्या निमित्ताने 3 ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजता मंगरुळपीर तालुका कृषी अधिकारी कार्यालयात एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. माजी उपविभागीय कृषी अधिकारी अनिल बोंडे, तालुका कृषी अधिकारी सचिन कांबळे यांच्यासह मान्यवरांची यावेळी उपस्थिती राहील. ॲग्रोवन कट्ट्याचे समन्वयक रशीद शॉदा व केशव भगत यांचीदेखील यावेळी उपस्थिती राहणार आहे. शेतकऱ्यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले  आहे.

Web Title: nagpur news agrowon Mangarulipir