द्राक्षांच्या शिवारसौद्यातही आडतवसुली

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 जानेवारी 2017

व्यापाऱ्यांची बेबंदशाही सुरूच; कारवाईची शेतकऱ्यांची मागणी

नाशिक (प्रतिनिधी) : राज्य शासनाने बाजार समित्यांत शेतकऱ्यांकडून आडत स्वीकारणे बंद केले आहे. शिवारसौद्यात तर आडतीचा कुठलाच संबंध येत नाही, मात्र तरीही बहुतांश व्यापाऱ्यांकडून द्राक्षांच्या शिवारसौद्यात 5 ते 8 टक्‍के आडतवसुली सुरूच असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांच्या आहेत. पणन व सहकार विभागाने तातडीने लक्ष द्यावे व आडतीची सक्ती करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

राज्यात आगाप द्राक्षे ऑक्‍टोबर महिन्यापासूनच बाजारात येण्यास सुरवात झाली आहे. देशांतर्गत बाजारपेठेत माल पाठविणारे व्यापारी नाशिक, सांगली विभागात डेरेदाखल झाले आहेत. शेतमाल बाजारातून आडतमुक्ती झाली आहे. मात्र द्राक्षांचे व्यापारी शेतकऱ्यांच्या पट्टीतून बेकायदा आडतवसुली करीत असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी केल्या आहेत, यामुळे शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त होत आहे.

सोशल मीडियातूनही एल्गार
प्रतिकूल परिस्थितीशी सामना करून आपण माल पिकवतो. त्या मालाची प्रतवारी आपणच करायची. वजन काटाही आपणच करायचा. माल गाडीत लोड करूनही द्यायचा. एवढे करूनही व्यापाऱ्याला तोटा झाला तर तो आपले पैसे बुडवणार व पळून जाणार. मग कमिशन (आडत) कशासाठी द्यायचे, असा रोखठोक सवाल करीत आडत बंद करण्याचे आवाहन नाशिक, सांगली, सोलापूर, पुणे विभागातील द्राक्ष उत्पादकांच्या व्हॉटसऍप ग्रुपमधून करण्यात येत आहे.

-------------------------------------------------------------
"शासनाने आडत बंद केली असली तरी बहुतांश व्यापाऱ्यांकडून आडतीच्या नावाखाली हिशेब पट्टीतून पैसे कापले जात आहेत. हा अन्याय आहे. याबाबत आम्ही लवकरच मुख्यमंत्री, पणनमंत्री, पणन मंडळ यांच्याकडे तक्रार करणार आहोत.''
- संतोष काश्‍मिरे, द्राक्ष उत्पादक, गिरणारे, ता. जि. नाशिक.
-------------------------------------------------------------

"पणन मंडळाने व्यापाऱ्यांची नोंद ठेवून त्यांच्या व्यवहारांवर लक्ष ठेवण्याची व्यवस्था करणे आवश्‍यक आहे. शासन, पोलिस यंत्रणेचे नियंत्रण नसल्याने द्राक्ष व्यवहारात व्यापाऱ्यांची मनमानी सुरू आहे.''
- संतोष झोमन, कुरनोली, ता. दिंडोरी, जि. नाशिक.
-------------------------------------------------------------

Web Title: nashik: grapes and farmer