शेतशिवारात बहरले कांदा बियाणे पीक

अंबड तालुक्यातील चित्र, शेतकऱ्यांना उत्पन्नाची आशा
कांदा बियाणे पीक
कांदा बियाणे पीकsakal

अंबड : शेतशिवारात सध्या कांदा बियाणे पीक बहरलेले आहे. मात्र वातावरणात होणाऱ्या बदलामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहेत. तालुक्यातील शेतकऱ्यांनी यंदा पाणी उपलब्ध असल्याने मोठ्या प्रमाणावर बियाणाच्या कांद्याची लागवड केली. सध्या पीक बहरात आहे. मात्र सतत होत असलेल्या वातावरणाचा बद्दल,नैसर्गिक आपत्ती,रोगराईचे संकट पाठ सोडायला तयार नाही. बेमोसमी पाऊस, बदलते वातावरणामुळे आर्थिक गणित बिघडू नये याचीच चिंता शेतकरी दिवसरात्र करत आहे. तालुक्यातील मार्डी, पारनेर, धनगरपिंपरी, शेवगा, साडेसावंगी, आवा, अंतरवाला, कर्जत, हस्तपोखरी, लोणारभायगाव, बदापूर, मठपिंपळगाव, नागझरी, हारतखेडा, बठाण,काटखेडासह परिसरात शेतात जोमात आलेले कांद्याचे पीक लक्ष वेधून घेत आहेत.

कांदा चाळीसाठी अनेकांना अनुदान

शेतकऱ्यांना आपल्या शेतात पिकविलेल्या कांदा साठवून व सुरक्षित ठेवण्यासाठी कृषी विभागाच्या वतीने कांदा चाळीसाठी अनुदान मिळत आहे.यामुळे तालुक्यात शेकडो शेतकऱ्यांनी अनुदान घेऊन शेतात कांदा चाळ बनविल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com