पर्यटकांकडून थेट शेतातून स्ट्रॉबेरीची खरेदी

पर्यटकांकडून थेट शेतातून स्ट्रॉबेरीची खरेदी

भिलार, जि. सातारा - पाचगणी-महाबळेश्वर या दोन्ही पर्यटनस्थळांवर सकाळी अंगाला झोंबणारी गुलाबी थंडी आणि दुपारी ऊन असा खेळ सुरू झाला असताना बाजारपेठेतही देखण्या लालचुटुक स्ट्रॉबेरीचा रंग चढायला लागला आहे.

सध्या पाचगणीच्या बाजारात स्टॉलवर ३०० ते ३५० रुपये, तर शेतकऱ्याच्या थेट शेतात ताजी तजेलदार ४०० ते ४५० रुपये किलोने स्ट्रॉबेरी मिळत आहे. या दोन्ही पर्यटनस्थळी आल्यावर स्ट्रॉबेरीची चव चाखून न जाणारा पर्यटक विरळा. मनसोक्त भ्रमंती आणि लालचुटुक स्ट्रॉबेरीचा आस्वाद हे एक अनोखे समीकरणच झाले आहे. 

कोरोना आणि अनियमित वातावरणामुळे स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका गतवर्षी बसला. परंतु, यातून सावरत शेतकरी पुन्हा नव्या जोमाने हंगामाला सामोरा जात आहे. यावर्षी लागवड उशिरा झाल्यामुळे दिवाळीत बाजारपेठेत येणारी स्ट्रॉबेरी उशिरा आली आणि त्यामुळे भावही कडाडले. सध्या बाजारपेठेत स्ट्रॉबेरी दाखल झाली असून, स्ट्रॉबेरीच्या स्टॉलवर ३०० ते ३५० रुपये किलो दराने स्ट्रॉबेरी उपलब्ध आहे. परंतु, अलीकडे पर्यटनाचा ‘ट्रेण्ड’च बदलला असून, पर्यटक भटकंती करून शेताच्या बांधावर जाऊन स्ट्रॉबेरीचा आस्वाद घेताना दिसत आहेत. या ठिकाणी आनंदाने पर्यटक शेतकऱ्याला ३५० ते ४०० रुपये भाव देत आहेत. स्वीटचार्ली आणि विंटर प्लस नावाच्या जातीच्या स्ट्रॉबेरीला बाजारात मोठी मागणी आहे. 

आणखी बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

अलीकडच्या काळात पर्यटक थेट शेतावर येऊन स्ट्रॉबेरी खरेदी करू लागल्याने दरही आम्हाला चांगला मिळत असून, आगळे वेगळे समाधानही आम्हाला लाभत आहे.
- संदीप पांगारे, शेतकरी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com