रब्बीसाठी मुबलक खते

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 8 नोव्हेंबर 2016

कृषी विभागाने सप्टेंबरपासून नियोजन केल्यामुळे मोठ्या प्रमाणात खते उपलब्ध करून दिली आहेत. चालू महिन्यातही सहा लाख मेट्रिक टन खते उपलब्ध होणार आहे. त्यामुळे पेरणीच्या वेळी खतांची अडचण भासणार नाही.

- सुभाष जाधव, अतिरिक्त संचालक, विस्तार विभाग, कृषी आयुक्तालय, पुणे.

मार्च २०१७ पर्यंत टप्प्याटप्प्याने उपलब्ध होणार

पुणे - रब्बी हंगामात शेतकऱ्यांना पेरणीसाठी खतांची अडचणी येऊ नये, म्हणून कृषी विभाग शेतकऱ्यांना मुबलक खते उपलब्ध करून देण्यावर भर देत आहे. शेतकऱ्यांना हंगामात मागणीपैकी पेरणीसाठी १० लाख ८९ हजार मेट्रिक टन खते उपलब्ध झाली असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली. 

राज्यात रब्बीचे सरासरी ५४ लाख हेक्टर क्षेत्र आहे. यंदा रब्बीची सरासरीएवढीच पेरणी होण्याचा अंदाज आहे. त्यासाठी कृषी विभागाने ३४ लाख मेट्रिक टन खतांची मागणी केली होती. शासनाने त्याला मंजुरी दिली आहे. मंजूर केलेली खते कृषी विभाग संबंधित कृषी सेवा केंद्रांमार्फत शेतकऱ्यांना टप्प्याटप्प्याने मार्च २०१७ पर्यंत उपलब्ध करून देणार आहे. सध्या खरिपातील सप्टेंबरमध्ये झालेल्या पुरवठ्यातील पाच लाख १८ हजार मेट्रिक टन खते शिल्लक आहेत. यामध्ये युरिया एका लाख १ हजार टन, डीएपी एक लाख ५ हजार, एमओपी २६ हजार, संयुक्त खते दोन लाख ६२ हजार, एसएसपीची २४ हजार मेट्रिक टन खते शिल्लक आहेत. गेल्या वर्षी रब्बी हंगामात २७ लाख ५ हजार मेट्रिक टन खतांचा वापर झाला होता.

Web Title: Rabbi much for fertilizers