मराठवाड्यातील तीन जिल्ह्यांत सोयाबीनची उत्पादकता घटली

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 डिसेंबर 2016

औरंगाबाद - औरंगाबादसह जालना व बीड जिल्ह्यांत यंदाच्या खरीप हंगामातील सोयाबीनच्या उत्पादकतेत गत पाच वर्षांच्या सरासरीच्या तुलनेत घट आली आहे. उडीद, मूग, बाजरी या पिकांच्या उत्पादकतेत मात्र वाढ नोंदल्या गेल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली. 

औरंगाबाद - औरंगाबादसह जालना व बीड जिल्ह्यांत यंदाच्या खरीप हंगामातील सोयाबीनच्या उत्पादकतेत गत पाच वर्षांच्या सरासरीच्या तुलनेत घट आली आहे. उडीद, मूग, बाजरी या पिकांच्या उत्पादकतेत मात्र वाढ नोंदल्या गेल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली. 

यंदाच्या खरीप हंगामात औरंगाबाद, जालना व बीड जिल्ह्यांत बाजारीची १ लाख ५६ हजार ९७८ हेक्‍टरवर पेरणी झाली होती. मुगाची ८४ हजार ४० हेक्‍टरवर, उडदाची ५३ हजार ५०१ हेक्‍टरवर तर सोयाबीनची सर्वाधिक ३ लाख ६९ हजार ७२७ हेक्‍टरवर पेरणी झाली होती. या पेरणी झालेल्या क्षेत्रावरील पीकनिहाय कापणी प्रयोग घेण्यात आले. त्या प्रयोगातून सोयाबीनच्या उत्पादकेत घट नोंदली गेली आहे. ही घट खासकरून बीड व औरंगाबाद जिल्ह्यांत नोंदली गेली असून, जालना जिल्ह्यात मात्र गत पाच वर्षांच्या सरासरी उत्पादकतेच्या तुलनेत सोयाबीनच्या उत्पादकतेत वाढ नोंदल्या गेल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

पीक.........५ वर्षांची सरासरी उत्पादकता (हेक्‍टरी, किलोमध्ये)...........यंदाची उत्पादकता (हेक्‍टरी, किलोमध्ये) 
सोयाबीन...११८५............................................................१०७१ 
बाजरी.......९२०.............................................................९५८ 
उडीद........५२४.............................................................६८१ 
मूग............५०२............................................................६२४ 

बीडमध्ये सोयाबीनची उत्पादकता सर्वांत कमी 
गत पाच वर्षांतील सरासरी उत्पादकतेच्या तुलनेत यंदा बीड जिल्ह्यात सर्वांत कमी हेक्‍टरी ६४० किलोग्रॅमची उत्पादकता नोंदली गेली आहे. औरंगाबाद जिल्ह्यात हेक्‍टरी १०३९ किलोग्रॅम तर जालना जिल्ह्यात सोयाबीनची उत्पादकात तीन जिल्ह्यात सर्वांत जास्त १४८३ किलोग्रॅम आल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

घटीमागे अतिवृष्टी 
बीड जिल्ह्यात सोयाबीनच्या उत्पादकतेत सर्वाधिक घट येण्यामागे जुलै ते ऑक्‍टोबरदरम्यान झालेल्या अतिवृष्टीचाही हात असल्याचे मानले जाते. बीड जिल्ह्यात यंदा खरिपात केवळ ८६ हजार २२ हेक्‍टर सोयाबीनचे सरासरी क्षेत्र होते. तुलनेने यंदा २ लाख १७ हजार ९५१ हेक्‍टरवर सोयाबीनची पेरणी झाली. या सोयाबीनपैकी २ लाख १६ हजार २५५ हेक्‍टरवरील सोयाबीनचे अतिवृष्टीने नुकसान झाले. औरंगाबाद जिल्ह्यात मात्र पावसाच्या खंडाने सोयाबीनच्या उत्पादकतेत गत पाच वर्षांतील सरासरी उत्पादकतेच्या तुलनेत यंदा घट आली आहे. 

पीकनिहाय घेण्यात आलेले कापणी प्रयोग 
औरंगाबाद जिल्हा 
पीक...............नियोजन...............प्रत्यक्ष प्रयोग 
सोयाबीन.......१२८...................१२८ 
बाजरी..........२७६...................२७६ 
उडीद.............७६...................७२ 
मूग.................१९२...............१९१ 

बीड जिल्हा 
पीक...............नियोजन...............प्रत्यक्ष प्रयोग 
सोयाबीन.......२८८...................२८८ 
बाजरी..........३१२...................३१० 
उडीद.............१६०..................१५६ 
मूग.................३२४...............३२४ 

जालना जिल्हा 
पीक...............नियोजन...............प्रत्यक्ष प्रयोग 
सोयाबीन.......१०८...................१०४ 
बाजरी..........१९२...................१७६ 
उडीद.............१५६...................१५० 
मूग.................४०८...............३८८ 

Web Title: soybean farming