कृषी सचिवांच्या गावातील शेतकऱ्यांचा कल प्रयोगशीलतेकडे

प्रतिनिधी
Sunday, 22 November 2020

यंदा या गावातील शेतकरी शंभर एकरांवर कांदा बीजोत्पादन करीत असून, यासाठी नियमितपणे शेतीशाळा वर्ग सुरू करण्यात आला आहे. श्री. डवले यांनीही या उपक्रमात सहभाग घेतला असून, ते कांदा लागवडीवर लक्ष ठेवून आहेत.

अकोला - राज्याचे कृषी सचिव एकनाथ डवले यांच्या मूळगावी माळवंडी (जि. बुलडाणा) येथे शेतकरी विविध प्रयोग करू लागले आहेत. यंदा या गावातील शेतकरी शंभर एकरांवर कांदा बीजोत्पादन करीत असून, यासाठी नियमितपणे शेतीशाळा वर्ग सुरू करण्यात आला आहे. श्री. डवले यांनीही या उपक्रमात सहभाग घेतला असून, ते कांदा लागवडीवर लक्ष ठेवून आहेत.

हेही वाचा : ग्राहकांच्या अपेक्षेनुसार उत्पादन करणारी करार शेती

माळवंडी गावात यंदा १०० एकरांवर कांदा बीजोत्पादन केले जाणार असून, जवळपास हजार क्विंटल कांद्याची लागवड केली जात आहे. दर्जेदार बीजोत्पादन करण्याच्या हेतूने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी कृषी विभागाने या गावात शेतीशाळा आयोजित केली आहे. तज्ज्ञ म्हणून कृषी सहायक विठ्ठल धांडे हे उपस्थित राहून मार्गदर्शन करीत आहेत. 

हेही वाचा : कंत्राटी शेती : फायद्याची की शोषणाची?

शुक्रवारी (ता. २०) माळवंडी येथे कांदा बीजोत्पादन शेतीशाळेचा दुसरा वर्ग झाला. या वेळी बुलडाणा दौऱ्यावर असलेले कृषिमंत्री दादा भुसे यांनीही धावती भेट दिली. श्री. डवले यांच्यासह विभागीय कृषी सहसंचालक सुभाष नागरे, उपविभागीय कृषी अधिकारी संतोष डाबरे यांची उपस्थिती होती. दुपारच्या सत्रात श्री. डवले यांच्या शेतावर मोसंबी लागवड, डॉलर हरभरा, कांदा बीजोत्पादन लागवड व वेस्ट डीकम्पोझर आदींची पाहणी करून सविस्तर चर्चा झाली.

आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: State Agriculture Secretary Eknath Dawale Farmers tend to experiment