साखर कारखान्यांची धुराडी दिवाळीनंतर पेटणार?

sugarfactory
sugarfactory

यंदा राज्यातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम उशिरा सुरू होण्याची शक्यता आहे. उसाची कमतरता भासणार असल्याने यंदा हंगाम कमी काळ चालेल. तसेच बरेच कारखाने पूर्ण क्षमतेने गाळप करू शकणार नाहीत, असे चित्र आहे. पावसाने पाठ फिरवल्यामुळे मराठवाड्यात सर्वाधिक अडचणीची स्थिती आहे. तेथील मोजकेच कारखाने यंदा उसाचे गाळप करण्याची शक्यता आहे. राज्यातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम विधानसभा निवडणुकीनंतर आणि दिवाळीनंतर सुरू होण्याची चिन्हे आहेत. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात कारखान्यांची धुराडी पेटण्याची शक्यता आहे.

मराठवाड्यात यंदा तीव्र दुष्काळामुळे उसाचे लागवडक्षेत्र घटले आहे. तसेच, बहुतांश ठिकाणी शेतकऱ्यांनी उपलब्ध ऊस चाऱ्यासाठी विकून टाकला आहे. तर दुसऱ्या बाजुला कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांत महापुरामुळे उसाच्या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक कारखान्यांना पुरेसा ऊसच उपलब्ध होणार नाही. त्यामुळे अनेक कारखाने पूर्ण क्षमतेने चालण्याची शक्यता नाही. गेल्या हंगामात राज्यातील १९५ साखर कारखान्यांनी ९५२ लाख टन उसाचे गाळप केले. एकूण १०७ लाख टन साखर उत्पादन झाले. यंदा मात्र बंद कारखान्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. मराठवाड्यात तर अनेक कारखान्यांनी यंदा गाळप सुरूच करणार नसल्याचे जाहीर केले आहे.

राज्यातील साखर उद्योग सरकारला वार्षिक दोन हजार कोटी रुपयांचा महसूल देते. गाळप हंगामाचा कमी कालावधी आणि अनेक ठिकाणी बंद राहणारे कारखाने याचा थेट परिणाम शेतकरी, ऊस तोड मजूर आणि व्यापाऱ्यांवर होणार आहे. ग्रामीण महाराष्ट्रातील सुमारे अडीच कोटी लोक चरितार्थासाठी साखर गळीत हंगामावर अवलंबून आहेत. साखर उद्योगामुळे सुमारे १ लाख ६५ हजार लोकांना थेट रोजगार मिळतो. तर सुमारे ८ लाख मजुरांना ऊस तोड आणि वाहतुकीच्या कामातून सहा महिन्यांच्या कालावधीसाठी रोजगार उपलब्ध होतो. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com