नगरमध्ये भाजीपाल्याच्या दरात सुधारणा  

प्रतिनिधी
Wednesday, 21 October 2020

नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत टोमॅटोची दर दिवसाला ४० ते ५० क्विंटलची आवक होत आहे. १ हजार ते २ हजार व सरासरी १ हजार पन्नास रुपयाचा दर मिळत आहे. वांग्यांची २४ ते ३० क्विंटलची आवक होत आहे.

नगर - येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या आठवडाभरात भाजीपाल्याच्या दरात सुधारणा कायम राहिली. आवकही बऱ्यापैकी होत आहे. भुसारमध्ये मूग, उडीद, सोयाबीन, हरभऱ्यांची आवक होत आहे. ज्वारीची आवक जेमतेम आहे, असे बाजार समितीतून सांगण्यात आले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत टोमॅटोची दर दिवसाला ४० ते ५० क्विंटलची आवक होत आहे. १ हजार ते २ हजार व सरासरी १ हजार पन्नास रुपयाचा दर मिळत आहे. वांग्यांची २४ ते ३० क्विंटलची आवक होत आहे. २ हजार ते ४ हजार व सरासरी तीन हजाराचा दर मिळाला. फ्लॉवरची २८ ते ३५ क्विंटलची आवक होऊन ३ हजार ते ५ हजार ५०० व सरासरी ४ हजार २५० रुपये, कोबीची ३३ ते ४० क्विटंलची आवक होऊन १ हजार ते २ हजार ५०० व सरासरी १ हजार ७५० रुपये, काकडीची ३० ते ३५ क्विंटलची आवक होऊन १ हजार ते २ हजार व सरासरी १ हजार ५००, गवारीची ७ ते १२ क्विंटलची आवक होऊन ५ ते ७ हजार व सरासरी ६ हजार रुपये दर मिळाला.  

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

भेंडीची २५ त ३० क्विंटलची आवक होऊन १ हजार ते २ हजार ५०० व सरासरी १ हजार ७५० रुपये दर मिळाला. घेवड्याची २ ते ५ क्विंटलची आवक झाली. दर ५ ते ७ हजार व सरासरी ६ हजार रुपये मिळाला. बटाट्याची ३३० ते ३५० क्विंटलची आवक होऊन २ हजार ८०० ते ३ हजार २०० व सरासरी ३ हजार, हिरव्या मिरचीची ३४ ते ४० क्विंटलची आवक होऊन ३ ते ५ हजार व सरासरी ४ हजार, शेवग्याची ५ ते ७ क्विंटलची आवक होऊन ४ हजार ते ६ हजार व सरासरी ५ हजार रुपये दर मिळाला. आल्याची १७ ते २५ क्विंटलची आवक झाली. सरासरी ४ हजार २५० रुपयांचा प्रती क्विंटल दर मिळाला, असे बाजार समितीचे सचीव अभय भिसे यांनी सांगितले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

भुसारमध्ये आवक जेमतेम
भुसारमध्ये हरभरा, मूग, उडीद, सोयाबीनची आवक होत आहे. अधूनमधून ज्वारीचीही आवक जेमतेम होत आहे. ज्वारीला २ हजार ५०० ते ३ हजार रुपयाचा प्रतिक्विंटल दर मिळत आहे. हरभऱ्याची दररोज ५० क्विंटलची आवक होत आहे. ३४०० ते ५०५० रुपये, मुगाची ७५ ते १०० क्विंटलची आवक होत असून ३५०० ते ७७०० रुपये, उडदाची ३० ते ५० क्विंटलची आवक होत आहे. ३६०० ते ६५०० रुपये दर मिळाला. सोयाबीनची १०० ते १५० क्विंटलची आवक होऊन ३५०० ते ३८५१ रुपयाचा दर मिळत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: vegetable prices in the Nagar