सुजय विखे पाटलांचं अण्णा हजारेंना आश्वासन; बेल्हे ते शिरूर रस्ता होणार दुरुस्त

मार्तंड बुचुडे
Tuesday, 12 January 2021

बेल्हे ते शिरुर रस्त्याचे सुमारे 16 कोटी रुपये खर्चाचे काम सुरू आहे. खासदार डॉ. विखे व सुजीत झावरे यांच्या हस्ते राळेगण थेरपाळ येथे कामाचे भूमिपूजन झाले. नंतर खासदार डॉ. अमोल कोल्हे व आमदार नीलेश लंके यांनी बेल्हे येथे भूमिपूजन केले. रस्त्याच्या मंजुरीवरूनही राजकारण पेटले होते. आता रस्त्याचे काम निकृष्ट असल्याच्या तक्रारी सुरू आहेत. थेट हजारे यांच्यापर्यंत तक्रारी गेल्या होत्या.
 
पारनेर (अहमदनगर) : बेल्हे ते शिरूर रस्त्याचे काम निकृष्ट होत असल्याची तक्रार थेट ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यापर्यंत पोचली. खासदार डॉ. सुजय विखे पाटील शनिवारी हजारे यांना भेटण्यासाठी गेले असता, हजारे त्यांना म्हणाले, की 'तुम्ही या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन केले आहे. आता हा रस्ता दर्जेदार व्हावा, हीसुद्धा तुमची जबाबदारी आहे.' त्यावर डॉ. विखे पाटील यांनी ठेकेदारास बोलावून दर्जेदार काम करण्यास सांगतो, असे आश्वासन दिले. 

अहमदनगरच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

बेल्हे ते शिरुर रस्त्याचे सुमारे 16 कोटी रुपये खर्चाचे काम सुरू आहे. खासदार डॉ. विखे व सुजीत झावरे यांच्या हस्ते राळेगण थेरपाळ येथे कामाचे भूमिपूजन झाले. नंतर खासदार डॉ. अमोल कोल्हे व आमदार नीलेश लंके यांनी बेल्हे येथे भूमिपूजन केले. रस्त्याच्या मंजुरीवरूनही राजकारण पेटले होते. आता रस्त्याचे काम निकृष्ट असल्याच्या तक्रारी सुरू आहेत. थेट हजारे यांच्यापर्यंत तक्रारी गेल्या होत्या.
 
हे ही वाचा : मिरजगावात भाजपला महाविकासने दिले आव्हान, प्रचाराचा नारळ

माजी मंत्री गिरीष महाजन व डॉ. विखे पाटील नुकतेच हजारे यांना भेटण्यासाठी गेले होते. त्यावेळी हजारे यांनी रस्त्याचा विषय मांडला. 'तुम्ही या रस्त्याचे भूमिपूजन केले, आता काम दर्जेदार व्हावा, हीसुद्धा तुमची जबाबदारी आहे' असे हजारे यांनी डॉ. विखे यांना सांगितले. त्यावर डॉ. विखे यांनी ठेकेदारास बोलावून सांगतो, असे आश्वासन दिले. हजारे म्हणाले, की ज्यांनी रस्त्याचे भूमिपूजन केले, त्या सर्वांनीच हे काम चांगले करण्याची जबाबदारी आहे. सर्वच राजकीय व सामाजिक कार्यकर्त्यांनी कामात लक्ष द्यावे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title:  Anna hajare sujay vikhepatil belhe to shirur road news