

₹1 crore fraud in Parner co-operative society; 22 accused booked, co-operative sector in turmoil.
Sakal
पारनेर: पतसंस्थेत जास्त व्याजाचे आमिष दाखवून ठेवी घेतल्या. मात्र, ठेवींची मुदत संपूनही ठेवीची रक्कम परत न करता ठेवीदार व त्याच्या कुटुंबीयांची एक कोटी १० लाख आठ हजार ३२३ रुपयांची फसवणूक केल्याची घटना पारनेर तालुक्यातील निघोज येथील मळगंगा नागरी सहकारी पतसंस्थेत घडली. या प्रकरणी संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक मंडळ, व्यवस्थापक, विशेष वसुली अधिकारी, अशा २२ जणांवर ५ नोव्हेंबर रोजी फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.