esakal | श्रीरामपूर : दुचाकींची चोरी करणारा सराईत गजाआड; १२ दुचाकी जप्त
sakal

बोलून बातमी शोधा

12 bikes seized from two-wheeler thief at Shrirampur

श्रीरामपूर : दुचाकींची चोरी करणारा सराईत गजाआड; १२ दुचाकी जप्त

sakal_logo
By
गौरव साळुंके

श्रीरामपूर (जि. नगर) : श्रीरामपूरसह राहाता व शिर्डी परिसरातुन दुचाक्या चोरलेल्या सराईत गुन्हेगारास गजाआड करण्यात येथील तालुका पोलीसांना यश आले. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोबिंग ऑपरेशनद्वारे तालुका पोलिसांनी चितळी (ता. राहाता) परिसरात सापळा लावुन शुक्रवारी (ता.१०) ही कारवाई केली. तालुका पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सराईत आरोपी दत्तु सावळेराव पवार (वय २९, रा. रांजणगाव, ता. राहाता) याला चोरी केलील दुचाकी विकताना रंगेहात पकडले.


त्याच्याकडील एक दुचाकी जप्त केली. त्यानंतर चौकशी करुन आणखी ११ दुचाक्या जप्त केल्या. या प्रकरणी येथील तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन आरोपीला येथील जिल्हा व सत्र न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने शुक्रवार (ता. १०) पासून पुढील चार दिवस मंगळवार (ता. १४) पर्यंत आरोपीला पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते. दरम्यान, पोलीस कोठडीत अधिक चौकशी सुरु असताना आरोपीने श्रीरामपूरसह वाकडी, चितळी, राहाता व शिर्डी परिसरातुन आणखी दुचाक्या चोरी केल्याची कबुली दिल्याची माहिती पोलिस उपअधिक्षक संदिप मिटके यांनी आज (सोमवारी) सायंकाळी येथे पत्रकार परिषेदत दिली.

हेही वाचा: डिंभे, वडज, चिलवडी धरणे ओव्हर फ्लो!

हेही वाचा: अकोले तालुक्यात ७६ आदिवासी गावात एक गाव एक गणपती

loading image
go to top