

Kopargaon tehsildar initiative settles 75 land and road disputes
sakal
पोहेगाव: कोपरगावमधील शेत-शिवार रस्त्यांच्या प्रलंबित केसेसवर तहसीलदार महेश सावंत यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन न्यायनिवाडा करण्याची मोहीम हाती घेतली आहे. प्रशासनाच्या या गतिमानतेमुळे आतापर्यंत तब्बल ७५ क्लिष्ट प्रकरणे निकाली निघाली आहेत. हिंगणी येथील पारधी वस्तीचा १४ वर्षांपासून प्रलंबित असलेला वाद सामंजस्याने मिटवून या मोहिमेने आपला यशस्वी ७५ वा टप्पा पूर्ण केला आहे. ‘बांधावरच न्यायनिवाडा’ हा ‘कोपरगाव पॅटर्न’ आता राज्यात नावारूपाला येत आहे.