
अहिल्यानगर : गंज बाजार येथील सोने-चांदी दागिन्यांच्या हॉलमार्किंगचे व्यावसायिक राजेश बाळासाहेब भोसले (रा. सारसनगर) यांची तिघा सीएनी १८ लाख ३१ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी भोसले यांच्या फिर्यादीनुसार तिघांविरुद्ध कोतवाली पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.