अहमदनगर : चेसी चालकाची दुचाकीस्वाराला धडक; दोन जखमी

Accident
Accidentesakal

अहमदनगर : वाहनाच्या चेसी चालकाने दुचाकीस्वारास धडक दिल्याने दोन जण जखमी झाले आहे. अहमदनगर- पुणे महामार्गावर चास (ता. नगर) शिवारात हा अपघात झाला.

चेसीचे चाक गेले पोटावरून

वसिम आयुबभाई तांबोळी (वय 32, रा. सुपा, ता. पारनेर) हे 10 फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेचार वाजता (एमएच 16 सीएस 3222) दुचाकीवर मित्रासमवेत अहमदनगरवरून सुपा गावाकडे जात होते. चास (ता.नगर) शिवारात भारत पेट्रोलपंपाजवळ त्यांना पांढऱ्या रंगाच्या वाहनाची चेसी (MA7777D2N3A03071) पाठीमागील बाजुने जोराची धडक दिली. वसिम तांबोळी यांच्या पोटावरून वाहनाच्या चेसीचे चाक गेले. त्याचे मित्र ही जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्यांनी रुग्णालयात दिलेल्या जबाबावरून नगर तालुका पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस नाईक शिंदे या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.

Accident
महात्मा फुले कृषी विद्यापीठातील शिक्षण ‘क्वारंटाइन’
Accident
दानवेंनी वडापावचे पैसे दिले नाहीत? रोहित पवारांचा मिसळ खाताना टोला

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com