महात्मा फुले कृषी विद्यापीठातील शिक्षण ‘क्वारंटाइन’

राहुरीत प्रशासनाने कोविड सेंटरसाठी केलेले अधि‘ग्रहण’ अद्याप हटेना
Mahatma Phule Krishi Vidyapeeth education update
Mahatma Phule Krishi Vidyapeeth education updatesakal

राहुरी : महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथील कृषी अभियांत्रिकी (बी. टेक) व कृषी पदव्युत्तर (एम.एस्सी. ॲग्री) महाविद्यालये अद्यापि सुरू झाली नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. कोरोना काळात महसूल प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाच्या इमारती अधिग्रहीत केल्या. ते अधिग्रहण अद्यापि काढले नाही. त्यामुळे कृषी अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांचे शिक्षण लाल फितीत अडकले आहे.

राज्य सरकारने कोरोनाचे निर्बंध शिथिल करून, राज्यातील सर्व महाविद्यालये १५ फेब्रुवारीपासून ऑफलाइन सुरू करण्याचा अध्यादेश काढला. त्यात कोरोनाच्या स्थानिक परिस्थितीनुसार विद्यार्थ्यांना वसतिगृहात राहण्याची परवानगी स्थानिक प्रशासनावर सोपविण्यात आली. कृषी अभ्यासक्रमांचे राज्यातील खासगी महाविद्यालये सुरू झाली. मात्र, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथील महाविद्यालये सुरू होऊ शकली नाहीत.कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाच्या आदेशाने तालुका प्रशासनाने साथरोग प्रतिबंधक कायद्यान्वये कृषी विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाच्या पाच इमारती व शेतकरी भवन अशा सहा इमारती अधिग्रहीत केल्या. त्या इमारतींत कोरोना हेल्थ सेंटर करून, त्यातील ५७० खोल्या-बेड आरक्षित करण्यात आले. तिसरी लाट ओसरली. कोरोनाचा एकही रुग्ण कृषी विद्यापीठातील हेल्थ सेंटरमध्ये राहिला नाही.

शासनाने महाविद्यालय सुरू करण्याचा अध्यादेश जारी करताच कृषी विद्यापीठ प्रशासनाने तालुका व जिल्हा प्रशासनाकडे वसतिगृह इमारती वापरण्यास परवानगी मागितली. आठवडाभरापासून दररोज पाठपुरावा सुरू आहे. परंतु, तालुका व जिल्हा प्रशासनाकडून अद्याप हिरवा कंदील मिळाला नाही. त्यामुळे, कृषी विद्यापीठ प्रशासन हतबल झाले आहे. कृषी अभियांत्रिकीचा अभ्यासक्रम अवघड व प्रात्यक्षिकांचा असल्याने, ऑनलाइन शिक्षण आकलन होत नसल्याची विद्यार्थ्यांची ओरड आहे. ऑफलाइन शिक्षण मिळावे, अशी मागणी आहे.

राज्यातून व देशभरातून आलेले विद्यार्थी कृषी अभियांत्रिकी (बी. टेक.) शिक्षण घेतात. शंभर टक्के विद्यार्थी वसतिगृहात राहतात. तालुका व जिल्हा प्रशासनाकडे वसतिगृहाचे अधिग्रहण हटवून, वसतिगृह सुरू करण्याची परवानगी मागितली आहे. ती प्रतिक्षेत आहे. त्यामुळे, महाविद्यालय सुरू करणे शक्य झाले नाही.

- डॉ. दिलीप पवार, प्राचार्य, डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी महाविद्यालय, राहुरी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com