ब्रेकिंग ः नगरमध्ये गुरूवार ठरला कोरोनावार...दिवसात सव्वीस पॉझिटिव्ह

21 corona patients in Ahmednagar
21 corona patients in Ahmednagar

नगर ः लॉकडाउन हटले आणि नगर कोरोनाचे माहेरघर बनले. सुरूवातीच्या काळात नऊ-दहा रूग्ण सापडत होते. आता तर कालपासून ही रूग्ण संख्या २५च्या घरात गेली आहे. संगमनेर तालुक्याने शंभरी गाठली आहे.

नगरात आज आणखी २६ रुग्णांची भर पडली. त्यात वाघ गल्ली (नालेगाव) बारा, संगमनेर तीन, श्रीरामपूर दोन, सुपा, चंदनपूर (राहाता), पारनेर, दरेवाडी (नगर तालुका) प्रत्येकी एकाचा समावेश आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांची आकडा ३५४ वर पोचला आहे. आज आणखी सहा जणांना डिस्चार्ज देण्यात आल्याने कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या आता 260 झाली आहे. 

आज सकाळी प्राप्त झालेल्या अहवालानुसार पॉझिटिव्ह आढळून आलेल्यामध्ये शहरातील वाघ गल्ली (नालेगाव) येथील 42 वर्षांची महिला, 45 व 50 वर्षांचा पुरुष, 18 वर्षांच्या युवकाला कोरोना बाधा झाल्याचे स्पष्ट झाले. हे सर्व रुग्ण यापूर्वीच्या बाधित व्यक्तीच्या संपर्कातील आहे. 
सुपा (पारनेर) येथील 56 वर्षांची महिला कोरोना बाधीत आढळून आली.

आजाराची लक्षणे जाणवल्याने उपचारासाठी रुग्णालयात त्या दाखल झाल्या होत्या. चंदनपूर (राहाता) येथील 24 वर्षांच्या युवकाला कोरोनाची लागण झाली. आजाराची लक्षणे जाणवल्याने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले होते. मोमीनपुरा (संगमनेर शहर) भागातील 46 वर्षांचा पुरुष, नाईकवाडपुरा भागातील 50 वर्षांची महिला कोरोना बाधित झाली. आजाराची लक्षणे जाणवल्याने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले होते.

श्रीरामपूर येथील 52 वर्षांच्या पुरुषाला आजाराची लक्षणे जाणवल्याने उपचारासाठी रुग्णालयात दाखल होते. त्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले. तसेच महांकाळ वडगाव (श्रीरामपूर) येथील 76 वर्षांच्या महिला कोरोना बाधित आढळून आली. ठाणेहून (खडकवाडी) पारनेर येथे आलेला 40 वर्षांचा पुरुष, तसेच कळवा (मुंबई)हून दरेवाडी (नगर) येथे आलेला 40 वर्षांचा पुरुष कोरोना बाधित आढळून आला. दोघेही मुंबई पोलिस दलात कार्यरत आहे.

आज सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालानुसार वाघ गल्ली (नालेगाव) आठ, तर कुरण (संगमनेर) येथील एका रुग्णाला कोरोनाची बाधा झाली. हे सर्व पूर्वी बाधित असलेल्या रुग्णांच्या संपर्कातील आहे. 
कोरोनाच्या वाढत्या प्रसाराला आळा घालण्यासाठी प्रशासनाने सावध भूमिका घेत, चितळे रोड, सिद्धीबाग, नालेगाव परिसर पत्रे ठोकून सील केला आहे. 

याशिवाय, राजेवाडी (जामखेड) येथील युवक दिल्ली येथे, नव नागापूर येथील व्यक्ती पुणे येथे आणि संगमनेर येथील व्यक्ती नाशिक येथे बाधित आढळून आल्या होत्या. त्या व्यक्ती तेथेच उपचार घेत आहेत. तसेच सारसनगर येथील एक व्यक्ती मुंबई येथे बाधित आढळून आली होती. आज आणखी एका रुग्णाचा अहवाल खाजगी प्रयोगशाळेत पॉझिटिव आला. या व्यक्तींची नोंद आयसीएमआरच्या पोर्टलवर आपल्या जिल्ह्यात नोंदवण्यात आली आहे त्यामुळे रुग्ण संख्येत वाढ झाली आहे.

 
नगर शहरात कोरोनाचा प्रसार झपाट्याने होत आहे. नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये. काळजी घ्या, स्वच्छता राखा. शासन-प्रशासनाने सांगितलेल्या उपाययोजनेची काटेकोर अंमलबजावणी करावी. 
- बाबासाहेब वाकळे, महापौर 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com