esakal | पोलिस निरीक्षकांच्या हलगर्जीपणामुळे २१ जणांचे जीव धोक्यात
sakal

बोलून बातमी शोधा

21 people in danger due to negligence of police inspectors

राहुरी पोलिसांनी गुरुवारी (ता. २७) दोन संशयीत आरोपींना अटक केली. त्यांचे कोरोना तपासणीसाठी स्वॅब घेण्यात आले.

पोलिस निरीक्षकांच्या हलगर्जीपणामुळे २१ जणांचे जीव धोक्यात

sakal_logo
By
विलास कुलकर्णी

राहुरी (अहमदनगर) : राहुरी पोलिसांनी गुरुवारी (ता. २७) दोन संशयीत आरोपींना अटक केली. त्यांचे कोरोना तपासणीसाठी स्वॅब घेण्यात आले. त्यांचा कोरोना अहवाल येण्यापूर्वीच त्यांची रवानगी कारागृहातील बराकीत करण्यात आली. त्यातील एकजण शुक्रवारी (ता. २८) रात्री कोरोना पॉझिटिव्ह आढळला.

चारजणांची क्षमता असलेल्या बराकीत १३ जणांमध्ये कोरोना पॉझिटिव्ह कैद्याने २४ तास काढले. पोलिस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्या हलगर्जीपणामुळे बराकीतील १३ कैदी व कारागृहाचे आठ सुरक्षा पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोना संसर्गाचा धोका निर्माण झाला आहे.

हेही वाचा : राहुल सोलापूरकर म्हणाले ‘हे’ दिवस इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहीले जातील
देसवंडी येथे गुरुवारी सकाळी पत्र्याचे शेड बांधण्याच्या कारणावरून दोन गटात घातक शस्त्राने तुंबळ हाणामारी झाली होती. त्यात आठ जण गंभीर जखमी झाले होते. या घटनेत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यातील एकवीस दिवसांनी गुरुवारी (ता. २७) पोलिसांना शरण आले. राहुरी न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. त्यांना इतर कैद्यांबरोबर बराकीत ठेवण्यापूर्वी त्यांची कोरोना टेस्ट करण्यासाठी स्वॅब घेण्यात आले. 

कोरोना तपासणीचा अहवाल मिळण्याची वाट न पाहता राहुरीचे पोलिस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी दोन्ही आरोपींना गुरुवारी रात्री तेरा कैदी असलेल्या बराकीत ठेवले. शुक्रवारी रात्री त्यातील एक २३ वर्षांचा पोलिस कोठडीतील संशयित आरोपी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल पोलिस ठाण्यात धडकला.  त्यामुळे, राहुरी पोलिसांचे धाबे दणाणले. कोरोना पॉझिटिव्ह आरोपीला बराकीतून हलविण्यासाठी धावपळ उडाली.  बराकीत निर्जंतुकीकरणाची फवारणी करण्याची वेळ आली.

नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
कोरोना तपासणीचा अहवाल येईपर्यंत दोन्ही आरोपींना स्वतंत्र ठिकाणी सुरक्षितस्थळी ठेवणे अपेक्षित होते. परंतु, त्यांना बराकीत ठेवण्याचा पोलिस निरीक्षक देशमुख यांचा अट्टाहास व हलगर्जीपणा नडला. त्यामुळे, बराकीतील इतर तेरा कैदी कोरोना पॉझिटिव्ह आरोपीच्या संपर्कात आले. दोन दिवस कारागृहाच्या सुरक्षेसाठी तैनात आठ पोलीस कर्मचारी यांचाही संपर्क आला.  त्यामुळे, त्यांना कोरोना संसर्ग होण्याचा धोका निर्माण झाला आहे. पोलीस निरीक्षक देशमुख यांचा अट्टाहास व हलगर्जीपणा इतरांना जीवघेणा ठरण्याची भीती निर्माण झाली आहे.

संपादन : अशोक मुरुमकर