esakal | राहुल सोलापूरकर म्हणाले ‘हे’ दिवस इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहीले जातील
sakal

बोलून बातमी शोधा

Lecture by Rahul Solapurkar at Sangamner Festival of Malpani Industries Group

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून समान नागरिक कायद्याची केवळ चर्चा सुरु होती. 1955 मध्ये राज्यघटनेत या कायद्याचे कलम समाविष्ट करण्यात आले.

राहुल सोलापूरकर म्हणाले ‘हे’ दिवस इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहीले जातील

sakal_logo
By
आनंद गायकवाड

संगमनेर (अहमदनगर) : देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून समान नागरिक कायद्याची केवळ चर्चा सुरु होती. 1955 मध्ये राज्यघटनेत या कायद्याचे कलम समाविष्ट करण्यात आले.

गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये सीएए कायदा पारित झाल्यानंतर सरकारने समानतेच्या दिशेने पहिले निर्णायक पाऊल टाकले. त्यामुळे 9 आणि 11 डिसेंबर 2019 हे दोन दिवस भारतीय इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहीले जातील, असे प्रतिपादन ज्येष्ठ सिनेअभिनेते राहुल सोलापूरकर यांनी केले.

राजस्थान युवक मंडळ व मालपाणी उद्योग समूहाच्या संगमनेर फेस्टिव्हलमध्ये ऑनलाईन व्याख्यानात शेवटचे पुष्प गुंफतांना ‘समान नागरी कायदा आणि राष्ट्रीयत्व’ या विषयावर अभिनेते सोलापूरकर बोलत होते.

नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
नागरिकत्व सुधारणा विधेयकाच्या (सीएए) विरोधात देशात काही ठिकाणी उसळलेला हिंसाचार अविद्येतून घडल्याचे सांगत, आपल्या अभ्यासपूर्ण व्याख्यानातून त्यांनी या कायद्यातील बारकावे स्पष्ट केले. वास्तविक आपल्या देशात स्थलांतरीत होवून येणार्‍यांना नागरिकत्व देण्याबाबतचा कायदा 1955 मध्येच अस्तित्त्वात आला आहे. यावेळी त्यात केवळ सुधारणा केली गेली. मात्र हा कायदा मंजूर होताच देशातील काही भागात 13 आणि 20 डिसेंबरला पूर्वनियोजीत हिंसाचार झाल्याचे तपासातून समोर आले आहे. ही सुधारणेची 73 वर्षांपूर्वी घडायला हवी असणारी घटना 2019 मध्ये घडली. हे आपले दुर्दैव असल्याचे ते म्हणाले. देशाच्या इतिहासात 2014 मध्ये पहिल्यांदाच बिगर काँग्रेसी सरकार बहुमताने सत्तेत आले. भाजपाच्या तेव्हाच्या जाहीरनाम्यातही तिहेरी तलाक, जीएसटी, कलम 370 व 35 ए, नागरिकत्त्व सुधारणा या विषयांचा समावेश होता. सत्तेत आल्यानंतर त्यांनी त्याची अंमलबजावणी केली.

हेही वाचा : श्रीरामपूर तालुक्यातील ग्रामपंचायतीवर ‘हे’ आहेत प्रशासक
देशाच्या राज्यघटनेत नागरिकत्व देण्याबाबत अन्य प्रचलित तरतूदींशिवाय डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कायदेशीरपणे स्थलांतरीत झालेल्यांना नागरिकत्व मिळावे, यासाठी नोंदणी पद्धतीची सुविधा दिली असून, भाजपाने त्या कायद्यात केवळ सुधारणा केली आहे. मात्र याची पूर्ण माहीती किंवा अभ्यास न करता, अस्तीत्वाची भीती घालून हिंसाचार घडवण्यात आला. देशाच्या अंतर्गत आणि बाह्य सुरक्षेसाठी महत्वाचा असलेल्या, घटनेतील समानतेच्या कलमाची व्याप्ती वाढवणाऱ्या कायद्याच्या समर्थनार्थ प्रत्येक भारतीयाने पाठींबा देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

संपादन : अशोक मुरुमकर