esakal | श्रीगोंद्यातील निम्मे अजूनही लसीविना; गावोगावी लस राहतेय शिल्लक | Ahmednagar
sakal

बोलून बातमी शोधा

लसीकरण मोहीम

श्रीगोंद्यातील निम्मे अजूनही लसीविना; गावोगावी लस राहतेय शिल्लक

sakal_logo
By
संजय आ. काटे


श्रीगोंदे (जि. अहमदनगर) : कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी मोठा गाजावाजा झाला. मध्यंतरी लस मिळत नसल्याच्या तक्रारी वाढल्या. रांगेत उभे राहून लोकांनी लस घेतली. लसीची कमतरता असल्याने प्रशासनही गोंधळलेले होते. मात्र सद्यस्थितीत निम्मा तालुका लसीच्या पहिल्या डोसअभावीच असल्याची माहिती समजली.


काही दिवसांपासून लस शिल्लक राहत असून लोक ती घेण्यासाठी येत नसल्याचे समजले. दरम्यान या गोंधळात कोरोना वाढल्याने तालुक्यातील दहा गावे लाॅकडाऊन केल्याने सामान्यांची हतबलता वाढली आहे. तालुक्यातील कोरोनाने पुन्हा डोके वर काढल्याचे प्रशासन सांगत असले तरी लोकांना ते मान्य नाही. इतर जिल्ह्याच्या तुलनेत आपल्याकडे कोरोना चाचणी होत असल्याने ही आकडेवारी पुढे येत आहे. असे मत अनेक व्यापाऱ्यांनी व्यक्त केले. अर्थात याला प्रतिबंध घातला जायला हवा. याविषयी सगळ्यांचे एकमत आहे. काही दिवसांपुर्वी रांगेत गर्दी करुन लस घेणारे लोक गायब झाल्याने तालुक्यात लस घेणाऱ्यांची संख्या मोठी असल्याचा अंदाज प्रशासनाच्या आकडेवारीत फोल ठरत आहे.

तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. नितीन खामकर म्हणाले, श्रीगोंदे तालुक्यात दोन लाख ५७ हजार ४०१ जणांना ही लस द्यायची आहे. त्यापैकी १ लाख ३३ हजार लोकांनी पहिला डोस घेतला आहे. हे प्रमाण ५१ टक्के आहे. यात ३७ हजार ३७२ जणांनी दुसरा डोस घेतला आहे. म्हणजे दोन्ही लसीचे डोस घेणाऱ्या लोकांची संख्या १ लाख ७१ हजाराच्या घरात आहे. हे प्रमाण कमी असून प्रशासन व सामाजीक कार्यकर्ते कष्ट घेत असले तरी गावोगावी आलेली लस शिल्लक राहत असल्याचे वास्तव आहे.

हेही वाचा: अहमदनगर जिल्ह्यातील 61 गावांमध्ये दहा दिवसांचा लॉकडाऊन


काष्टी, कौठे, लोणीव्यंकनाथ, मढेवडगाव, येळपणे, कोळगाव, बेलवंडी, घारगाव, शेडगाव ही गावे १३ आक्टोंबरपर्यंत पुर्णपणे बंद करण्याचा फतवा प्रशासनाने काढला आहे. यातून बँका व कृषी सेवा केंद्रेही सुटले नाहीत. त्यातच महसूल व पोलिस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी दुकाने सील करण्याची मोहित हाती घेतल्याने सामान्य लोक, शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.शेतकरी कामात गुंतले

शेतात कांदा लागवडीचा मोसम असून मजूर तेथे गुंतलेले आहेत. एकरी आठ ते दहा हजार रुपये ही लागवड असल्याने मजूरांचा ओढा तिकडे जास्त आहे. लस घेतल्यावर दोन दिवस घरी थांबावे लागेल या भावनेतून मजूर लस घेत नाहीत.

हेही वाचा: धुळगावचे सुपुत्र जवान सचिन गायकवाड अनंतात विलीन!

loading image
go to top