Ahmednagar | जिल्ह्यात धावल्या 36 बस, संपामुळे 15 कोटींचा फटका

ST
STesakal


अहमदनगर : राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी सुरू केलेल्या काम बंद आंदोलनाचा फटका सर्वसामान्य प्रवाशांना बसला आहे. यामध्ये अहमदनगर विभागालाही तब्बल सुमारे पंधरा कोटींचा आर्थिक फटका बसला आहे, अशी माहिती STच्या सूत्रांनी दिली. विविध मागण्यांसाठी ST कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन सुरू आहे. या आंदोलनामुळे एसटीची सेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे. ऐन दिवाळीच्या धामधुमीपासून सुरू झालेला संप अद्याप मिटलेला नाही. हा प्रश्‍न सुटण्याऐवजी दिवसेंदिवस वाढत चालला आहे. या संपामुळे काही कर्मचाऱ्यांवर कारवाईही करण्यात आली आहे.

अहमदनगर विभागाच्या ५३० बसच्या माध्यमातून दोन हजार फेऱ्या होत. त्यातून एसटीच्या अहमदनगर विभागाला रोज सुमारे ५० लाखांचे उत्पन्न मिळत होते. त्यातून महिन्याला सुमारे पंधरा कोटी रुपये उत्पन्न मिळत होते. संपामुळे हे उत्पन्न बुडाले. मात्र, आता वातावरण बदलू लागले आहे. एसटीचे फलाट हळूहळू गजबजताना दिसू लागले आहेत.

हॉकर्स उपाशी

राज्य परिवहन महामंडळाच्या बसस्थानकांमध्ये अधिकृत परवाने काढून खाद्यपदार्थांची विक्री करणाऱ्या हॉकर्सवर या संपामुळे उपाशी राहण्याची वेळ आली आहे. प्रवासीच नसल्याने या हॉकर्सवर आता दुसरीकडे काम पाहण्याची वेळ आली आहे.

ST
'महाविकास आघाडीने भ्रष्टाचाराचे रेकॉर्ड मोडले'

भाडे माफ करण्याची मागणी

राज्य परिवहन महामंडळाच्या बसस्थानकांमध्ये उपाहारगृहे व इतर व्यवसायिकांना गाळे भाडेतत्त्वावर देण्यात आले आहेत. मात्र, सध्याच्या संपामुळे स्थानकांतील व्यावसायिकांना फटका बसला आहे. एसटी प्रशासनाने भाडे माफ करावे, अशी मागणी या व्यावसायिकांमधून होत आहे.

३६ बस सोडल्या

जिल्ह्यातील शेवगाव, कोपरगाव व तारकपूर आगारांतून एसटी धावण्यास सुरवात झाली आहे. यामध्ये कोपरगावमधून एक, शेवगावमधून २७ व तारकपूर आगारातून ८, अशा एकूण ३६ बस धावत आहेत.

ST
मंत्री प्राजक्त तनपुरे EDच्या रडारवर, तब्बल 8 तास चौकशी

ST दृष्टिक्षेपात

एकूण आगारे : ११
बस : ५३०
चालक व वाहक : तीन हजार
मेकॅनिक : ७००
एकूण दैनंदिन उत्पन्न : ५० लाख
३० दिवसांत तोटा : १५ कोटी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com