

Maharashtra Bank Scam: Case Registered Against 17 in Parner
Sakal
-मार्तंड बुचुडे
पारनेर: पारनेर तालुका सैनिक सहकारी बँकेत चार कोटी तीन लाख 57 हजार 949 रुपयांचा अपहार झाला आहे. या बाबत दि्वितीय लेखापरीक्षक वर्ग एक ( सहकारी संस्था नाशिक) राजेंद्र फकीरा निकम यांनी पारनेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्या नुसार बँकेचे विद्यमान चेअरमन शिवाजी व्यवहारे व मुख्य व्यवस्थापक संजय कोरडे याच्यासह काही संचालक व कर्जदार अशा 17 जणांवर फसवणूक व अफरातफर केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.