कोरोना बनला नगरकरांचा काळ...आजचा आकडा ४१, एकूण सहाशेपार

41 patients in Nagar district on Sunday
41 patients in Nagar district on Sunday

नगर ः जिल्ह्यात सर्वच तालुक्यांत कोरोनाचे रूग्ण  सापडत आहेत. अगदी आदिवासी, दुर्गम समजल्या जाणाऱ्या अकोल्या तालुक्यातही रूग्ण सापडत आहेत. कोरनाने दुसऱ्या टप्प्यात नगरकरांच्या तोंडचे पाणी पळवले आहे. रविवारी तब्बल ४१ रूग्ण सापडले. 

संगमनेर तालु्क्यातील कुरण तर कोरोनाचे कुरण बनला आहे. तेथे आज सायंकाळी २२जण बाधित आढळले.

अहमदनगर जिल्ह्यात आज सकाळी आणखी १२ रुग्ण वाढले होते. नगर तालुक्यात नवनागापूर येथे ०३, नगर शहरात पदमानगर  ०२, नाईकवाडपुरा (संगमनेर) ०१, श्रीरामपूर ०१, 
गवळी वाडा (भिंगार ) ०२, खेरडा (पाथर्डी) ०२, राहाता ०१
आज ६० व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. सायंकाळपर्यंत तेरा रूग्ण आढळले होते.

आज रात्री आणखी २८ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यामध्ये संगमनेर तालुक्यातील कुरण येथील २२ जण बाधित आढळून आले आहेत. याशिवाय श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव येथील ०५ जण बाधित आढळून आले आहेत. निंबे नांदूर (ता. शेवगाव) येथील एक रुग्ण कोरोना बाधित आढळला आहे. जिल्ह्याचा एकूण आकडा ६१८ झाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com