

Sangamner Leopard Attack
sakal
-राजू नरवडे
संगमनेर: रात्रभराचा उकाडा सरला... सकाळच्या शांत प्रहरी थंड हवेची झुळूक येत होती... मुलगा शांत झोपलेला... आई स्वयंपाक करण्यात व्यस्त... इतक्यात घराच्या दरवाजातून बिबट्या आत घुसला अन् सुरू झाली आईच्या मातृत्वाची परीक्षा... स्वतःचा जीव धोक्यात घालून तिनं मुलाला वाचविलं अन् स्वतःलाही सुखरूप बाहेर काढलं.