अहिल्यानगर: सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यातील सरपंचपदाचे फेर आरक्षण प्रक्रिया राबविला जात आहे. जिल्ह्यातील बिगर अनुसूचित क्षेत्रातील २०२५ ते २०३० या पाच वर्षांच्या कालावधीत कार्यकाळ पूर्ण होणाऱ्या १ हजार २२३ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदांपैकी ९१५ सरपंच पदे आरक्षित राहणार आहेत. खुल्या गटाचे ३०८ सरपंच होतील. प्रातांधिकारी आणि तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली सरपंचपदाचे आरक्षण काढण्यास सुरुवात झाली. बुधवारी ५१८ ग्रामपंचायतीचे आरक्षण काढण्यात आले. उर्वरित ग्रामपंचायतचे आज आरक्षण काढण्यात येणार आहे.