
राहुरी (अहमदनगर) : चिंचविहिरे- मल्हारवाडी दरम्यान वन खात्याच्या हद्दीत एक धिप्पाड बिबट्या दोन दिवसांपासून मरणासन्न अवस्थेत फिरत होता. प्रकृती खालावल्याने दोन पावले चालणेही त्याला कठीण झाले होते. उपचार गरजेचे असताना वनाधिकाऱ्यांच्या अक्षम्य हलगर्जीपणाचा बिबट्या बळी ठरला. मंगळवारी सकाळी साडेनऊ वाजता भागडा डोंगराच्या पायथ्याशी बिबट्या मृतावस्थेत आढळला. (a leopard was found dead in rahuri on tuesday morning)
अंदाजे पाच वर्षे वयाचा बिबट्या दोन दिवसांपासून मरणासन्न अवस्थेत फिरत होता. सोमवारी सकाळी दहा वाजेपासून वन खात्याचे अधिकारी त्याच्या हालचालींचे केवळ निरीक्षण करीत होते. चिंचविहिरेचे माजी सरपंच शरद पानसंबळ यांच्यासह अनेक ग्रामस्थ, उपचार करून बिबट्याचा जीव वाचवावा, यासाठी वन विभागाच्या अधिकाऱ्यांशी वारंवार संपर्क साधून, परिक्षेत्र अधिकारी महादेव पोकळे, वनपाल परदेशी यांच्याकडे पाठपुरावा करीत होते. मात्र, मंगळवारी दिवसभर वन खात्याने केवळ बघ्याची भूमिका घेतली. उपचार न मिळाल्याने अखेर बिबट्याने प्राण सोडले.
उत्तरीय तपासणीमध्ये बिबट्याच्या पोटात अन्नाचा कणही नसल्याचे आढळले. त्यामुळे भुकेने व्याकूळ होऊन बिबट्या मृत झाल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी पोकळे यांनी दिली.
वन खात्याच्या अधिकाऱ्यांशी सोमवारी दिवसभर वेळोवेळी संपर्क साधून बिबट्याला वाचविण्याची विनंती केली. त्याला ताब्यात घेऊन उपचार करणे शक्य होते. भुकेने नाही, तर बिबट्या वनाधिकाऱ्यांच्या अक्षम्य हलगर्जीपणाचा बळी ठरला आहे.
- शरद पानसंबळ, माजी सरपंच, चिंचविहिरे
बिबट्याला ‘डॉट’ मारून ताब्यात घ्यावे लागत होते. तसे वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविले होते. सोमवारी दिवसभर वनकर्मचारी बिबट्याच्या हालचालींवर नजर ठेवून होते. मंगळवारी सकाळी त्याचा नैसर्गिक मृत्यू झाला.
- महादेव पोकळे, वनपरिक्षेत्र अधिकारी, राहुरी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.