esakal | कोळगावकरांनी पकडून दिला आरोपी; अन् आरोपीने साधली चांगलीच संधी
sakal

बोलून बातमी शोधा

accused cheating police

कोळगावकरांनी पकडून दिलेल्या आरोपीची पोलिसांच्या हातावर तुरी

sakal_logo
By
संजय काटे

श्रीगोंदे (जि.अहमदनगर) : कोळगाव येथे चोरीचा प्रयत्न करणाऱ्या एका गुन्हेगाराला गावकऱ्यांनी धाडसाने पकडले. बेलवंडी पोलिसांना माहिती देत या आरोपीला त्यांच्या हवाली केले; मात्र हा आरोपी पोलिसांना गुंगारा देत वाहनातून उडी मारून पसार झाला. विशेष म्हणजे बेलवंडी पोलिसांचे गस्ती पथक एक चालक आणि एक कर्मचारी, असे असल्याने आरोपीला आयती संधी मिळाल्याचे बोलले जाते. (Accused-cheating-with-police-marathi-news)

पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

कोळगाव येथील नगर-दौंड महामार्गाजवळील एका वस्तीवर काल (मंगळवारी) चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला. मात्र, सुगावा लागल्याने लोकांनी त्यातील एका चोरट्याला शिताफीने पकडले. त्याला धरून ठेवत बेलवंडी पोलिस ठाण्यात फोन करून घटनेची माहिती दिली. काही वेळात बेलवंडी पोलिसांच्या गस्ती पथकातील वाहन तेथे आले. आरोपीला हाताला बांधून वाहनातून घेऊन गेले. दरम्यान, पोलिसांच्या वाहनात एक चालक व एक कर्मचारी, एवढाच ताफा होता. आरोपीने पोलिसांची ही स्थिती पाहिली आणि पोलिस ठाण्यात पोचण्यापूर्वीच वाहनातून उडी मारून पसार झाला. त्या वेळी वाहन सुरू होते की थांबलेले, याची निश्चित माहिती समजली नाही. मात्र, गावकऱ्यांनी पकडून दिलेला आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झाला, हे मात्र निश्चित.

लोकांनी आरोपीला पकडले हे चांगले झाले; पण पोलिस ठाण्याच्या वाहनात चालकासोबत दोनच कर्मचारी होते. काही गावकऱ्यांना काही वाहनात बसायला सांगितले होते; मात्र कोणीही बसले नाही. या आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, शोध सुरू आहे. - संपत शिंदे, पोलिस निरीक्षक, बेलवंडी

गावकऱ्यांनी धाडसाने चोर पकडला व पोलिसांच्या ताब्यात दिला. त्यांच्या ताब्यातून तो कसा पळाला, याची चौकशी व्हावी. शिवाय, चोरटा पकडलेल्या वस्तीवर नंतर लगेच चोरी झाल्याने, ग्रामस्थांमध्ये दहशत आहे. - पुरुषोत्तम लगड, माजी सभापती, पंचायत समिती, श्रीगोंदे

हेही वाचा: पावसासाठी वेधशाळा, तज्ज्ञांच्या अंदाजाकडे बळीराजाच्या नजरा

हेही वाचा: कोरोनाचा प्रभाव कमी, मात्र पाय दुखण्याच्या व्याधींमध्ये वाढ

loading image