पोलिसांवर गोळीबार करणारा आरोपी गजाआड | Ahmednagar

police arrested
police arrestedesakal

अहमदनगर : नाशिक जिल्ह्यातील आडगाव येथील सराफ दुकानावरील दरोड्याच्यावेळेस पोलिस पथकावर गोळीबार करून जखमी अवस्थेत फरार असणारा तसेच तीन गंभीर गुन्ह्यात फरार असणारा सराईत आरोपी सुनीलसिंग जितसिंग जुनी (रा. काटवण खंडोबा, अहमदनगर) याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने शिताफीने अटक केली आहे.

पोलिसांना दाखवला कोयत्याचा धाक

स्थानिक गुन्हे शाखा यांना गुप्तबातमीदारामार्फत माहिती मिळाली की ता.12 सप्टेंबर 2018 रोजी एक सफेद रंगाची तवेरा कार (एमएच 14 डीए 6037 ) यामधून 7 ते 8 व्यक्‍ती मनमाड - अहमदननगर महामार्गाने अहमदनगर शहराच्या दिशेने कोठेतरी दरोडा घालण्यासाठी येत आहेत, अशी खात्रीशिर माहिती मिळाली. स्थानिक गुन्हे शाखा पथक निंबळक (ता. नगर) बाह्यवळण रस्ता चौकात वाहनांची तपासणी करीत होते. तवेरा वाहन चालकास वाहन थांबविण्याचा इशारा केला. त्यावेळेस सदर ठिकाणी असलेल्या गतीरोधकाजवळ चालकाने वाहनाचा वेग कमी केला. पाठीमागे बसलेले चार ते पाच व्यक्‍ती वाहनातूनखाली उतरून अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले. या फिर्यादीवरुन एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात सुनीलसिंग जुनीचा सहभाग होता.

police arrested
महिलांची पर्स ओढणाऱ्या सराईतांना पोलिसांनी 24 तासात केले गजाआड

फरार सुनीलसिंग जितसिंग जुनी या आरोपीने 2019 मध्ये आर. के. ज्वेलर्स, आडगांव (जि. नाशिक) या दुकानाचे शटरचे कुलूप तोडून दरोडा चोरी करण्याचा प्रयत्न करीत असताना पोलिसांचे वाहनाचा व सायरनचा आवाज ऐकून पळून गेला होता. या दरम्यान त्याचा पाठलाग करणाऱ्या पोलिस पथकास कोयत्याचा धाक दाखवून व गावठी कट्टयातून गोळीबार करून तो पळून जाण्याच्या प्रयत्नात होता. यावेळी पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केलेल्या गोळीबारामध्ये पायास गोळी लागून तो जखमी झाला होता. तेव्हापासून सुनीलसिंग जुनी हा आरोपी हा आडगांव पोलिस ठाण्यातील गुन्ह्यामध्ये फरार होता

पोलिस निरीक्षक अनिल कटके यांना गुप्तबातमीदाराकडून माहिती मिळाली की, फरार आरोपी सुनीलसिंग जुनी हा काटवण खंडोबा (अहमदनगर) येथे स्वतःचे नाव बदलून व वेशांतर करून राहत आहे. त्यानुसार पथकाने जाऊन त्याला अटक केली. आरोपी जुनी याच्याविरुध्द दरोडा, दरोड्याची तयारी, घरफोडी, चोरी व विनयभंग असे एकूण पाच गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.

police arrested
विश्वास संपादन केला अन् कांदा व्यापाऱ्याला घातला 34 लाखांचा गंडा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com