राशीनच्या सरपंचावरील कारवाई लालफितीच्या कारभारात अडकली

The action against Rashin sarpanch is stuck
The action against Rashin sarpanch is stuck

कर्जत (अहमदनगर) : तालुक्‍यातील राशीन येथील सरपंच यांनी सलग आठ महिने मासिक मीटिंग घेतली नाही असा अहवाल चौकशी समितीने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिला. मात्र तरीही सरपंच यांच्यावर कार्यवाही करण्यास टाळाटाळ होत असल्याबद्दल सदस्यांनी नाराजी व्यक्त केली व आंदोलनाचा इशारा दिला आहे, तसे निवेदन त्यांनी राज्याचे विभागीय आयुक्त नाशिक यांना दिले आहे. या निवेदनावर राम कानगुडे, युवराज सिंह राजे भोसले, हर्षदा अशोक जंजिरे, बापू उकिरडे, जनाबाई तात्याराम सायकर यांच्या सह्या आहेत. 

महामार्गासाठी कार्यकर्त्यांनी स्वत:लाच घेतलं कोंडून; अधिकारी गोंधळले
 
या निवेदनामध्ये त्यांनी पुढे म्हटले आहे की, ग्रामपंचायतीमध्ये सरपंच नीलम भीमराव साळवे यांनी त्यांच्या सरपंच पदाच्या कार्यकाळामध्ये मार्च 2020 ते आक्‍टोंबर 2020 या कालावधीमध्ये कोणत्याही प्रकारची मासिक मिटिंग घेतली नाही, असा अहवाल गटविकास अधिकारी कर्जत व गटविकास अधिकारी जामखेड यांच्या संयुक्त तपासणी पथकाने दिला आहे. यावरून महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 मधील 39 /1 अन्वय हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा असून तात्काळ सरपंचपद निलंबित करणे आवश्‍यक आहे, असे असताना देखील जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व आपल्या कार्यालयाकडून जाणून बुजून कारवाई करण्यास टाळाटाळ होत आहे. कर्जत पंचायत समितीचे गट विकास अधिकारी अमोल जाधव यांनी 23 डिसेंबर 2020 राशीन येथील सरपंच यांच्यावर कारवाई करणे बाबत सविस्तर अहवाल पाठवला आहे तर जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी यांच्याकडून देखील याबाबत 19 डिसेंबर 2020 बाबत पत्रव्यवहार, आयुक्त यांच्याकडे केली आहे. 

सिन्नर-घोटी महामार्गावर गोमांस नेणारा टेम्पो पकडला; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
 
राशीन ग्रामपंचायत ही तालुक्‍यातील मोठी ग्रामपंचायत असून दलित वस्ती वसंतराव नाईक तांडा सुधार योजना 14 वा वित्त आयोग घंटागाडी यासह अनेक कामांमध्ये आर्थिक अफरातफर झाली. याबाबतचा शासकीय अहवाल देखील प्राप्त झाला आहे. यामध्ये आवक जावक नोंदी नाहीत. ई-टेंडर कागदपत्रांमध्ये अ निमित्त आहे. ग्रामपंचायतीमध्ये दर पत्रक एकोरी आहेत. दर पत्रक व तुलनात्मक तक्ता दिसून येत नाही. ग्रामपंचायतीचे 1 ते 33 नमुने अद्यावत नाहीत, नियमांचे पालन केलेले दिसून येत नाही. झालेले खर्च व संभाव्य खर्च यास मासिक सभेमध्ये मंजुरी घेण्यात आलेले नाही, गटार दुरुस्तीचे मोजमाप पुस्तिका नाही, आठवडे बाजार लिलाव नाही, कार्यारंभ आदेश नसतानाही अनेक देयके अदा करण्यात आली आहेत.

ई टेंडर सुरक्षा ठेव घेतली गेली नाही. मात्र कोटेशन 18 तारखेच्या आहेत. यासह अनेक मुद्दे चौकशी समितीने कारवाईबाबत मांडले असून या सर्व बाबींसाठी तत्कालीन ग्रामसेवक सी एस तापकीर व भोईटे ग्रामसेवक यांच्यावर कारवाईदेखील करण्यात आली आहे, असे असताना सरपंच यांच्यावर मात्र कोणत्याही प्रकारची कार्यवाही करण्यास टाळाटाळ होत आहे. यामुळे तातडीने सरपंच यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अन्यथा आंदोलन करू, असा इशारा या सर्व सदस्यांनी निवेदनामध्ये शेवटी दिला आहे.  

या बाबत विभागीय आयुक्तांना अहवाल पाठवला आहे. त्यातील त्रुटीची पूर्तता सोमवारी पाठवीत आहोत. आयुक्तस्तरावर उचित कार्यवाही होईल. 
- अमोल जाधव, गटविकास अधिकारी, कर्जत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com