esakal | तांदळे टोळीविरुद्ध 'मोक्का'; सुपे पोलिस ठाण्यात आठ गुन्हे दाखल
sakal

बोलून बातमी शोधा

Action has been taken against the Tandale gang under the Maharashtra Organized Crime Control Act

तांदळे याच्याविरुद्ध सुपे पोलिस ठाण्यात आठ गुन्हे दाखल आहेत. तोफखाना पोलिस ठाण्याच्या हद्दीत रस्तालुटीचे सात गुन्हे दाखल आहेत.

तांदळे टोळीविरुद्ध 'मोक्का'; सुपे पोलिस ठाण्यात आठ गुन्हे दाखल

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अहमदनगर : विविध गंभीर गुन्हे दाखल असणाऱ्या कुख्यात नयन राजेंद्र तांदळे (वय 25, रा. भिस्तबाग नाका, सावेडी) याच्या टोळीविरुद्ध महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्यात आली.

सिन्नर-घोटी महामार्गावर गोमांस नेणारा टेम्पो पकडला; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी तांदळे टोळीविरुद्ध 'मोक्का' अन्वये कारवाई करण्यासाठी नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक प्रताप दिघावकर यांच्याकडे प्रस्ताव पाठविला होता. त्यांनी त्यास मंजुरी दिली. तांदळे याच्या टोळीतील पाच सदस्यांवर 'मोक्का' अन्वये कारवाई करण्यात आली. 

महामार्गासाठी कार्यकर्त्यांनी स्वत:लाच घेतलं कोंडून; अधिकारी गोंधळले

नयन राजेंद्र तांदळे, विठ्ठल भाऊराव साळवे (वय 27, रा. झापवाडी, ता. नेवासे), अक्षय बाबासाहेब ठोंबरे (वय 23, प्रेमदान चौक), शाहूल अशोक पवार (वय 31, रा. सुपे, पारनेर), अमोल छगन पोटे (वय 28, रा. सुपे) यांचा त्यात समावेश आहे. सुपे परिसरात, तसेच नगर-पुणे महामार्गावर पारनेर हद्दीत या टोळीने अनेकांना लुटले आहे. तांदळे याच्याविरुद्ध सुपे पोलिस ठाण्यात आठ गुन्हे दाखल आहेत. तोफखाना पोलिस ठाण्याच्या हद्दीत रस्तालुटीचे सात गुन्हे दाखल आहेत.

loading image