Akole women protest against Ladki Bahin Yojana
esakal
अकोले (जि. अहिल्यानगर) : लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असतानाही केवळ केवायसीच्या कारणावरून अपात्र ठरविण्यात आलेल्या महिलांचे बंद झालेले अनुदान पुन्हा सुरू करावे, तसेच योजनेतील जाचक अटी रद्द कराव्यात, या मागणीसाठी जनवादी महिला संघटनेच्या नेतृत्वाखाली महिलांनी अकोले तहसील कार्यालयावर मोर्चा (Akole women protest against Ladki Bahin Yojana) काढला. अनुदान बंद झाल्यामुळे गृहिणी, मोलमजुरी करणाऱ्या, घरकाम करणाऱ्या आणि आदिवासी महिलांमध्ये तीव्र नाराजी असून, सरकारने तातडीने मागण्या मान्य कराव्यात, अशी मागणी यावेळी करण्यात आली.