
"Ahilyanagar witnessed peaceful Ganesh Visarjan with DJ sounds and mandal power shows till midnight."
Sakal
अहिल्यानगर: ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष करत नगरकरांनी शनिवारी (ता. ६) मोठ्या उत्साहात लाडक्या गणरायाला निरोप दिला. ग्रामदैवत श्री विशाल गणेशाची सकाळी पारंपरिक पद्धतीने मिरवणूक काढण्यात आली. सुमारे १२ तास ही मिरवणूक सुरू होती. रात्री ८.४५ च्या सुमारास विशाल गणेशाचे विसर्जन झाले. दरम्यान, इतर मानाच्या मंडळांची मिरवणूक मध्यरात्रीपर्यंत सुरू होती. रात्री १२ च्या सुमारास पोलिसांनी डीजे बंद केले. त्यानंतर सर्व मंडळे दिल्लीगेट वेशीच्या बाहेर पडली. मिरवणुकीत काही मंडळांनी शक्तिप्रदर्शन केले.