Ahilyanagar leopard attacks
esakal
अहिल्यानगर जिल्ह्यात मागच्या काही दिवसांत बिबट्यांचे हल्ले मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. या हल्ल्यात आतापर्यंत ४ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर वनविभागाकडून या बिबट्यांना जेरबंद करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. वनविभागाने आतापर्यंत २३ बिबट्यांना जेरबंद केलं आहे. मात्र, वनविभागाला आता त्यांचा खर्च परवडेनासा झाला आहे. या बिबट्यांच्या खर्चासाठी वनविभागाकडून ४५ लाख रुपयांच्या निधीची मागणी शासनाकडे करण्यात आल्याची माहिती आहे.