
“Ahilyanagar municipality treasury facing shortage; civic services and development work affected.”
Sakal
-अरुण नवथर
अहिल्यानगर: महापालिकेच्या तिजोरीत सध्या खडखडाट आहे. नागरी सेवांवरील दैनंदिन खर्च भागविणे देखील कठीण झाले आहे. त्यातच सुमारे २०८ कोटी रुपयांची देणी थकीत आहेत. शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून सुरू असलेल्या कामांचा स्वहिस्सा भरण्यासाठी देखील महापालिकेकडे पैसे नाहीत. त्याचा परिणाम दैनंदिन नागरी सेवा आणि विकासकामांवर होत आहे. या आर्थिक संकटातून मार्ग काढण्याचे मोठे आवाहन महापालिका प्रशासनासमोर आहे.