Ahmednagar : जिल्हाधिकारी कार्यालयातील आचारसंहिता नियंत्रण कक्षाकडे आतापर्यंत ११४ तक्रारी दाखल

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झालेली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील आचारसंहिता नियंत्रण कक्षाकडे आतापर्यंत ११४ तक्रारी आल्या आहेत. या सी-व्हिजिल ॲपवरील शंभर टक्के तक्रारींचे निवारण झाले आहे.
Ahmednagar News
Ahmednagar Newssakal

Ahmednagar : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झालेली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील आचारसंहिता नियंत्रण कक्षाकडे आतापर्यंत ११४ तक्रारी आल्या आहेत. या सी-व्हिजिल ॲपवरील शंभर टक्के तक्रारींचे निवारण झाले आहे.

ई-मेल आणि प्रत्यक्ष कार्यालयात येऊन दिलेल्या तक्रारींपैकी ९० टक्के तक्रारी निकाली काढण्यात आल्या आहेत, अशी माहिती नायब तहसीलदार किरण देवतरसे यांनी दिली.

केंद्रीय निवडणूक आयोगाने देशात लोकसभा निवडणुकीसाठी कार्यक्रम १६ मार्च रोजी जाहीर केला. तेव्हापासूनच आचारसंहिता लागू झाली. आचारसंहिता लागू झाल्यानंतर काही कामे २४ तासांमध्ये, तर काही कामे ४८ तासांमध्ये पूर्ण करणे आवश्‍यक होते.

आचारसंहिता लागू झाल्यावर स्थानिक प्रशासनाने त्यांच्या हद्दीतील राजकीय पक्षांचे फलक, विकासकामांच्या कोनशिला झाकण्यासाठी भरारी पथके स्थापन केले. खासगी मालमत्तेवर राजकीय पक्षांचे चिन्ह, फलक असल्यास ते काढून टाकण्याची जबाबदारी संबंधितांवर होती.

फलक लावणे, झेंडे लावणे इतर कारणाने सार्वजनिक मालमत्ता विद्रुपीकरण करण्यावर बंदी घातली आहे. ज्या राजकीय पक्ष अथवा उमेदवारांनी सार्वजनिक मालमत्तेवर पोस्टर्स, भित्तीपत्रके चिकटविली होती, त्यांना ती तातडीने हटविण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले होते.

Ahmednagar News
Jalgaon Lok Sabha Code OF Conduct : रासायनिक खतांच्या विक्रीला आचारसंहितेचा अडसर

निवडणूक आयोगाने आचारसंहिता भंगाच्या तक्रारी नागरिकांना करण्यासाठी सी-व्हिजिल ॲप, ई-मेल, टोल फ्री क्रमांक आणि प्रत्यक्ष तक्रार दाखल करण्याचे चारही पर्याय उपलब्ध करून दिले होते.

नागरिक तक्रार करण्यासाठी सर्वाधिक पसंती सी-व्हिजिल ॲपला देत आहेत. या ॲपवर ८१ तक्रारी आल्या आहेत. या ॲपवरील तक्रारीचे १०० तासांमध्ये निवारण करणे बंधनकारक आहे. तक्रार ज्या भागातील आहे, त्या भागातील भरारी पथकाला ही तक्रार खात्री करण्यासाठी पाठविली जाते.

भरारी पथक हे पोलिस बंदोबस्तात त्या ठिकाणी जाऊन खात्री करतात. तक्रारीच्या निराकरणासाठी योग्य ती कार्यवाही करतात. तक्रारीचे निवारण झाल्याचा अहवाल निवडणूक आयोगाला पाठविला जात आहे.

Ahmednagar News
Dhule Code Of Conduct : परवानाधारकांची 482 शस्त्रे जिल्ह्यातून जमा; लोकसभा निवडणुकीमुळे कार्यवाही

तक्रारीचे स्वरूप

विकासकामांच्या कोनशीला न झाकणे, राजकीय नेत्यांचे बॅनर्स असणे, राजकीय पदाधिकाऱ्याच्या घराच्या संरक्षक भिंतीवर पक्षाचे चिन्ह असणे अशा स्वरूपाच्या सर्वसाधारण तक्रारी आहेत.

आकडे बोलतात

सी-व्हिजिल ॲपवरील तक्रारी- ८१

प्रत्यक्ष तक्रारी- ८

ई-मेलवर- २६

एकूण- ११४

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com