Jalgaon Lok Sabha Code OF Conduct : रासायनिक खतांच्या विक्रीला आचारसंहितेचा अडसर

Jalgaon News : शेतातील पिकांच्या जोमदार वाढीसाठी रासायनिक खतांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. या रासायनिक खतांवर शासन सबसिडी देत असते.
Fertilizers
Fertilizersesakal

वावडे : शेतातील पिकांच्या जोमदार वाढीसाठी रासायनिक खतांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. या रासायनिक खतांवर शासन सबसिडी देत असते. ती सबसिडी बंद केल्याने खतांच्या गोणींच्या किमतीत मागील अनेक वर्षांपासून सातत्याने वाढ होत आहे. खते कितीही महागडी झाली तरी शेतकऱ्यांना घ्यावीच लागतात. खतांच्या गोणीवर शासनाने पंतप्रधान नरेंद मोदी यांचे छायाचित्र छापले आहेत, त्या छायाचित्रा असलेल्या गोण्या दुकानदार अनेक वर्षांपासून विक्री करीत आहेत. (Jalgon Code of Conduct Obstacles to Sales of Chemical Fertilizers)

मात्र आता लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाल्याने राजकीय पक्ष, त्यांची चिन्हे आणि त्यांच्या फोटो असलेली कोणतीही वस्तू, बॅनर, नाव आणि फोटो असलेल्या कोणत्याही साहित्याने जाहिरात होईल, असे करू नये अथवा वापरू नये, असे स्पष्ट आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत.

परिणामी, निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र गोणीवर असल्यामुळे खतांची उपयुक्तता असूनही शेतकऱ्यांना विकता येत नसल्याने दुकानदारांची मोठी अडचण झाली आहे. मोठ्या प्रमाणात खताचा साठा असूनही शेतकरी खत घेण्यासाठी आलेले असतानाही आचारसंहितेच्या बंधनात खत विक्री करता येत नसल्याने शेतकऱ्याना नेमके काय सांगावे, असा प्रश्न दुकानदारांना भेडसावत आहे. (latest marathi news)

Fertilizers
Jalgaon Lok Sabha Election : अमळनेरला युती, आघाडीत राजकीय शांतता! मतदार संघात युती, आघाडीचा अजून एकही मेळावा नाही

दुकानदार लाख रुपये भांडवल खर्च करून खत खरेदी करतात आणि ते खत तत्काळ विक्री गेली तर भांडवल मोकळे होते. परंतु आचारसंहितेचा भंग होऊ नये, यासाठी खत विक्री करता येत नाही. लाखो रुपये भांडवल गुंतवून दुकानदारांना शेतकऱ्यांना खत विकता येत नसल्याने दुकानदारासह शेतकरी अडचणी सापडले आहेत.

"मागील काही वर्षांपासून रासायनिक खतांच्या गोण्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो आल्याने खत विक्री करताना प्रचंड अडचण निर्माण होत होती. त्यातच आता आचारसंहिता लागू झाल्याने निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार खताच्या गोण्या विक्री करता येत नाही. शेतकरी खते घेण्यासाठी येतात. परंतु फोटो असल्यामुळे शेतकऱ्यांना देता येत नाही आणि शेतकऱ्याचा गैरसमज होत आहे." - संजय पाटील, खत विक्रेते, वावडे, ता. अमळनेर

Fertilizers
Jalgaon News : शेतकऱ्यांना प्रतीक्षा पीककर्जाची! बँका, विकास संस्थांमध्ये कर्ज वितरणाची तयारी सुरू

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com