कोरोना लसीच्या वाटपास नगरचे केमिस्ट सज्ज

Ahmednagar chemist ready for distribution of Corona vaccine
Ahmednagar chemist ready for distribution of Corona vaccine

नगर ः कोरोनाची लस वितरित करण्यासाठी देशभरातील केमिस्टांच्या शृंखलेचा उपयोग करावा, या मागणीचे निवेदन अखिल भारतीय केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनने (एआयओसीडी) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिले आहे, अशी माहिती जिल्हा केमिस्ट संघटनेचे अध्यक्ष चेतनकुमार कर्डिले, जिल्हा सचिव राजेंद्र बलदोटा व कोषाध्यक्ष संजय वाव्हळ यांनी दिली. 

"एआयओसीडी'चे अध्यक्ष जे. एस. शिंदे यांनी पंतप्रधानांशी झालेल्या ऑनलाईन बैठकीत आश्वासन दिले होते, की देश कोविडमुळे आव्हानात्मक परिस्थितीतून जात आहे.

"एआयओसीडी' संस्थेच्या माध्यमातून 8 लाख 50 हजार सभासदांची मोठी साखळी आहे. संस्थेचे सक्रीय सदस्य कोणत्याही अडथळ्यांविना पूर्ण देशात औषधे उपलब्ध करून देतील.

कोविड संक्रमणाची भीती असूनही, संपूर्ण देशात आवश्‍यक त्या औषधांची सेवा देण्याचे काम अविरत चालू ठेवले. देशातील प्रत्येक व्यक्तीला कोविड लस देण्यासाठी, त्याचे वितरण, प्रशासनकरिता या लसीच्या निर्माण होणाऱ्या केंद्रबिंदूपासून ते ग्राहकापर्यंत पोचण्यासाठी एका मोठ्या कोल्ड स्टोअरेजची आवश्‍यकता असते. 

संपादन - अशोक निंबाळकर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com