esakal | अहमदनगर जिल्ह्यात 723 नव्या कोरोना रूग्णांची नोंद
sakal

बोलून बातमी शोधा

Ahmednagar corona updates

अहमदनगर जिल्ह्यात 723 नव्या कोरोना रूग्णांची नोंद

sakal_logo
By
टीम ई सकाळ

अहमदनगर : जिल्ह्यात 723 नवीन रुग्ण वाढले आहेत. रविवारी (ता. 5) कोरोनाच्या (Corona) उपचार सुरू असलेल्या 15 रुग्णांचा मृत्यू (Corona death) झाला. आतापर्यंत सहा हजार 587 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील बाधितांची संख्या तीन लाख 27 हजार 416 झाली आहे. उपचार सुरू असणाऱ्यांची संख्या आता 5 हजार 670 झाली आहे

संगमनेर तालुका रुग्ण संख्येत आघाडीवर

जिल्हा शासकीय रुग्णालयात 197, खासगी रुग्णालय प्रयोगशाळा 308 तर रॅपिड अँटीजेन (Rapid Antigen) चाचणीत 218 नवीन रुग्ण आढळून आले. संगमनेर तालुका रुग्ण संख्येत आघाडीवर राहिला आहे. सर्वाधिक रुग्ण 160 आढळून आले आहेत. कोरोनातून बरे झालेल्या 750 रुग्णांना डिर्स्चाज देण्यात आला. आतापर्यंत तीन लाख 26 हजार 693 रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.26 टक्के झाले आहे.

हेही वाचा: शेतकऱ्यांचा आनंद हेच समाधान : प्राजक्त तनपुरे

तालुकानिहाय रुग्णः

संगमनेर 160, पारनेर 86, अकोले 85, पाथर्डी 78, श्रीगोंदे 48, राहाता 45, नगर शहर 38, नगर तालुका 34, नेवासे 30, शेवगाव 29, राहुरी 25, श्रीरामपूर 20, कर्जत व जामखेड प्रत्येकी 16, कोपरगाव - 5, भिंगार छावणी परिषद 1, बाहेरील जिल्ह्यात सात रुग्णांचा समावेश आहे.

हेही वाचा: 70 हजारांची नोकरी सोडून बनला शेतकरी, आता महिन्याला कमावतो 9 लाख!

loading image
go to top